महानगरपालिका हद्दीत २१ व्या पशुगणनेस प्रारंभ*

नांदेड- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत २१ वी पशुगणना करण्याकरीता २० प्रभागात एकुण २३ प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली असुन त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ३ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. याबाबत मनपाचे आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्या निर्देशानुसार दिनांक ०४/१२/२०२४ रोजी अतिरिक्त आयुक्त, गिरिष कदम यांच्या अध्यक्षते खाली बैठक आयोजीत करण्यात आली होती त्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त यांनी सर्व क्षेत्रिय अधिकारी यांना आदेशीत केले की संबंधितांनी आपल्या कार्यालयात सर्व वसुली लिपिक व प्रगणक यांची बैठक आयोजीत करून प्रगणकांना त्यांच्या कार्य क्षेत्राची ओळख करून द्यावी तसेच शहरातील नागरिकांनी आपल्या घरातील असलेल्या पशुधनाची माहिती प्रगणकांना देऊन राष्ट्रीय कामात सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. सदरील बैठकीस जिल्हा पशु संवर्धन उपायुक्त, डॉ. राजकुमार पडीले, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी जिल्हा परिषद, डॉ. प्रवीणकुमार घुले, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त, डॉ अरविंद गायकवाड,, मनपाचे उपायुक्त श्री अजितपालसिंघ संधू, उपायुक्त श्री संजय नारायण जाधव, पशु शल्यचिकित्सक डॉ. मोहम्मद रईसोद्दीन, व सर्व क्षेत्रिय अधिकारी उपस्थित होते.


टिप्पण्या