*भारतातील बंदर व गोदी कामगारांची वेतनकरार अंमलबजावणीसाठी निदर्शने*

भारतातील बंदर व गोदी कामगारांना १  जानेवारी २०२२  पासून लागू होणारा वेतन  करार २७  सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई येथे संपन्न झाला. कायद्यानुसार झालेल्या वेतन कराराची अद्याप अंमलबजावणी झाली नाही म्हणून,  या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी प्रमुख बंदारांमध्ये  आज  तीव्र  निदर्शने झाली. या निदर्शनामध्ये प्रमुख कामगार नेत्यांनी गोदी कामगारांना आंदोलनाविषयी मार्गदर्शन केले.

  मुंबई बंदरात आंबेडकर भवन येथे ५ डिसेंबर २०२४ रोजी  झालेल्या निदर्शनामध्ये  मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी सुधाकर अपराज, प्रदीप नलावडे,  विद्याधर राणे, दत्ता खेसे, मनीष पाटील, शीला भगत, विष्णू पोळ,  रमेश कुऱ्हाडे, मिर निसार युनूस,  संतोष कदम,  व इतर पदाधिकारी, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे पदाधिकारी केेरसी पारेख, बबन मेटे व इतर पदाधिकारी, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष, मिलिंद घनकुटकर,  मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियन. फ्लोटीला वर्कर्स असोसिएशन व मुंबई पोर्ट ट्रस्ट  एससी एसटी वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी, या सर्वांच्या उपस्थितीत गोदी कामगारांनी  प्रचंड निदर्शने केली.  यापुढील आंदोलनात १० डिसेंबर रोजी सेवानिवृत्त कामगार व  कुटुंबिय यांचा राष्ट्रीय निषेध दिन आणि गरज भासल्यास १७  डिसेंबर रोजी किंवा त्यानंतर बेमुदत संप करण्याचे जाहीर केले आहे.

आपला 

 मारुती विश्वासराव 

प्रसिद्धप्रमुख 

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

टिप्पण्या