*महा थ्रो बॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री दर्शील मनोज कोटक यांचे एकमताने निवड*.

 


                महा थ्रोबॉल असोसिएशनची सर्वसाधारण सभा दिनांक एक डिसेंबर 2024 रोजी मुलुंड ठाणे (मुंबई )कालिदास क्रीडा संकुल येथील तथास्तु सभागृहामध्ये संपन्न झाली त्या ठिकाणी महा थ्रो बॉल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून श्री दर्शील मनोज कोटक यांचे एकमताने निवड करण्यात आली, सूचक  महा थ्रोबॉल  असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री दिनेश अहिरे नाशिक व अनुमोदन म्हणून डॉ संजय निकम बोदवड जिल्हा जळगाव यांनी दिले ,संपूर्ण राज्यभरातील 32 जिल्ह्यातील जिल्हा सचिव या सर्वसाधारण सभेला उपस्थित होते. माननीय फेडरेशनचे कार्यकारी सदस्य तथा ज्येष्ठ उपाध्यक्ष श्री चंद्रकांतजी निरभवणे सरांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली त्याप्रसंगी संघटनेचे महासचिव श्री राहुल वाघमारे , उपाध्यक्ष डॉ राकेश तिवारी , कार्यकारणी सदस्य श्री दीपक कदम खजिनदार प्रियंका धुरी यांच्या उपस्थितीमध्ये सर्वसाधारण सभा संपन्न झाली या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करून शालेय थ्रोबॉल क्रीडा स्पर्धा व सब ज्युनिअर, सीनियर स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री श्री दिनेश अहिरे यांनी थ्रोबॉल खेळाचे इतिहास व स्पर्धेचा लेखा जोखा सांगितला त्याप्रसंगी संघटनेचे महासचिव श्री राहुल वाघमारे मुंबई, उपाध्यक्ष डॉक्टर राकेश तिवारी चंद्रपूर ,औरंगाबाद जिल्हा सचिव गोकुळ तांदळे ,जळगाव जिल्हा सचिव डॉ संजय निकम परभणी जिल्हा सचिव कैलास माने, रायगड जिल्हा  सचिव श्री विलास मोरे, अहिल्यानगर जिल्हा सचिव प्रा बाबा गायकवाड , पुणे जिल्हा सचिव जयदीप तांमब्हेकर यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका दुरी, आभार श्री दीपक कदम यांनी मांनले.

टिप्पण्या