मुंबई - भारतीय रेल्वेत ४-६ डिसेंबर, २०२४ रेल कामगार युनियनच्या मान्यतेची निवडणूक होणार आहे. ह्या निवडणूकीत वेगवेगळ्या संघटनांनी आपले नामनिर्देशन देण्यासाठी तत्परता दाखवली आहे. परंतु मध्य रेल्वेत कामगारांच्या प्रत्येक प्रश्नांवर आवाज उठवते ती एकमात्र संघर्षशील व ऐतहासिक संघटना आहे "नेशनल रेल्वे मजदूर युनियन".
ऐतहासिक मान्यता निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या समाप्तीची सभा मुंबई शिवाजी टर्मीनस येथे सांयकाळी ४ वाजता ७००० कामगार लालम लाल होऊन ,मुंबई मंडळ कार्यालय ते सबर्बन लोवि पर्यंत स्टेशनवर जमा झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महामंत्री कॉ. वेणू पी नायर यांनी वंदन केले. त्यानंतर कार्यक्रम स्थळी महामंत्री याचं आगमन होताच कार्यकर्त्यांनी जल्लोषात पुष्प उधळून, मुंबई सी.एस.एम.टी. समन्वय समितीद्वारा पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले. स्टेशनवरील लॉबी समोरील जागेत स्क्रीन लाऊन महामंत्री यांच्या तर्फे वर्ष १९७४ च्या संपाची शॉर्ट फिल्म कामगार आणि प्रवाश्यांसाठी दाखविण्यात आली ज्याचा मनमुराद आनंद मुंबईच्या प्रवाश्यांनी व कामगारांनी घेतला यानंतर देशात जिथे जिथे संकट आले तेव्हां तेव्हां सामाजिक जाणिवेतून आर्थिक किंवा करोना काळात २०२-२०२१ ला व त्या अगोदरही मदत करण्याचे कार्य रेल्वेच्या नेशनल रेल्वे मजदूर युनियन (मध्य / कोकण) यांच्या माध्यमातून आले त्याची एक छोटीसी फिल्म दाखवण्यात आली. हि सर्व मदत कामगारांच्या नोमिनल सदस्य वर्गणीतून बचत करून करण्यात आली हे महत्वाचे आहे.
हा लाल झेंडा कोणत्याही राजनैतिक नेतृत्वाचा नाही. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ .बाबासाहेव आंबेडकरह्यांनी सर्वधर्म समभाव या भावनेतून कार्य केले त्याच भावनेतून ही युनियन कामगारांचे काम करत आहे, १०० वर्षा पेक्षा जास्त कार्यकाळात फक्त कामगारांसाठी कामे केली आहेत व पुढेही करणार, कामगारांच्या हितासाठी, त्यांच्या परीवारांसाठी, रेल हितासाठी, बेरोजगार युवासाठी रोजगार करून देण्यासाठी तसेच देशहितासाठी सर्व कामगारांनी निश्चय करून नेशनल रेल्वे मजदूर युनियनला एक मताने - एकमात्र मान्यता प्राप्त युनियन म्हणून निवडून आणणे काळाची गरज आहे असे आव्हान महामंत्री कॉ. वेणू पी नायर ह्यांनी ह्यावेळी कामगारांना केले. युनियनच्या अध्यक्षा कॉ. कामाक्षी बागलवाडीकर ह्यांनी आपले मत व्यक्त करून सर्वांचे आभार मानून सभेची सांगता केली.
addComments
टिप्पणी पोस्ट करा