श्रीरामपूर (. ): भारतीय क्रीडा क्षेत्रातील मुख्य संस्था म्हणजे स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया(SGFI). या संस्थेअंतर्गत भारतातील सर्व क्रीडा स्पर्धेचा आयोजन होते.या स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी श्रीरामपूरचे पार्थ सुरेश दोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या पदासाठी देशभरातून बरेचसे लोक प्रयत्नशील होते.दिनांक २८ सप्टेंबर रोजी लखनऊ येथे श्री पार्थ दोशी यांनी आपला पदभार स्वीकारला असून निश्चितच त्यांच्या नियोजनामध्ये शालेय जीवनामध्ये मुलांना दर्जेदार स्पर्धा भारतामध्ये खेळायला मिळेल.दोशी हे भारतातील सर्वात युवा अध्यक्ष म्हणून देखील प्रसिद्ध आहे. त्यांनी सन २०१७ ते २०२१ पर्यंत महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्षपद देखील भूषवले आहे.खेलो इंडिया यूथ गेम्स,बीच व्हॉलिबॉल चा वर्ल्डकप असेल यासाठी देखील त्यांची स्पर्धा समीक्षक म्हणून नेमणूक देखील करण्यात आली होती.खेळासाठी व गुणवान खेळाडूंसाठी त्यांची धडपड कायम असते.अनेक राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्ह्यात झाले आहे. दोषी हे स्वतः व्हॉलीबॉलचे राष्ट्रीय खेळाडू असून त्यांनी महाराष्ट्राचे कर्णधार पद देखील भूषवले आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व्यक्तिमत्व सौ कनकंम दोशी यांचे ते चिरंजीव आहेत.
स्कूल गेम फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी(SGFI) नियुक्ती झाल्याबद्दल दोशी यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक, टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ.व्यंकटेश वांगवाड, महासंघाचे अध्यक्ष आनंद खरे, क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र कोहकडे, टेनिस व्हॉलीबॉल राज्य उपाध्यक्ष डॉ . आबासाहेब सिरसाठ, राज्य सचिव गणेश माळवे, पत्रकार स्वामीराज कुलथे, नितीन बलराज,गौरव डेंगळे (क्रीडा प्रशिक्षक) मनोज मस्के, आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
addComments
टिप्पणी पोस्ट करा