यशवंत ' मधील प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचे राज्यस्तरीय सुयश*


 नांदेड:( दि.४ ऑक्टोबर २०२४)

           श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील समाजशास्त्र विषयाचे प्रा.ओमप्रकाश नागनाथराव गुंजकर यांना महाराष्ट्र राज्य व्हेटरन्स  अक्वेटिक असोसिएशनतर्फे नागपूर येथील दि. २१ व २२ सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या पंचविसाव्या राज्यस्तरीय मास्टर्स ऍक्युटिक चॅम्पियनशिप:२०२४ या जलतरण स्पर्धेत ५० मीटर मिडले रिप्ले स्पर्धेत गोल्ड, ५० मीटर फ्री रिले स्पर्धेत सिल्वर व १०० मीटर बॅक स्ट्रोक स्पर्धेत सिल्वर, १०० मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत ब्रांझ व ५० मीटर बॅक स्ट्रोक स्पर्धेत ब्रांझ अशा एकूण पाच पदकांची प्राप्ती झालेली आहे.

           यशवंत वरिष्ठ महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ.श्रीरंग बोडके यांना ४०० मीटर फ्री स्टाइल जलतरण स्पर्धेत सिल्वर मेडल प्राप्त झालेले आहे आणि राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे यांनी एकूण चार स्पर्धेत निर्धारित अंतर यशस्वीरित्या पार केले आहे.

          या राज्यस्तरीय सुयशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.कबीर रबडे, पर्यवेक्षिका प्रा. वंदना बदने, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयीका डॉ.एल. व्ही. पदमारानी राव, डॉ. मनोज पैंजणे, प्रा.उत्तम केंद्रे, डॉ. वीरभद्र स्वामी, डॉ.मीरा फड, डॉ. रामराज गावंडे, डॉ.मुकेश धर्मले, डॉ. संगीता मसारे, डॉ.एकनाथ मिरकुटे, प्रा.नरेंद्र कंचटवार, प्रा.श्रीकांत सोमठाणकर, प्रा. सचिन अपस्तंभ, सेवानिवृत्त वनअधिकारी गोपाळराव गुंजकर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक किशोर गुंजकर, श्रीकांत गुंजकर, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने आदींनी अभिनंदन करून भविष्यातील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत

टिप्पण्या