अंदमान च्या बेटावरून* (भाग शेवटचा ) *लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर


*मुकेश धोंगडे*

सर्व लेख खूप छान.विमान प्रवासात ३०० प्रवाशा समोर गाणे म्हणणे आणि ते ही सावरकरांचे... हे करण्याची धमक फक्त आपल्यातच आहे...या पूर्वी असे कधीही घडले नाही...आपण नांदेड चे नाव गाजवले... वंदे मातरम.

-------------------------------------

*डॉ.प्रदीप राजपूत,संपादक,लेखणीचे वादळ, बहादरपूरा-कंधार*

 झालेत बहू, होतिल ही बहू, पण दिलीपभाऊ सारखा प्रखर राष्ट्रभक्त दुर्मिळच...! जयस्तुतै, जयस्तुतै हे विर सावरकरांचे गित चक्क ३५ हजार फुट ऊंचीवर थेट विमानात गायिले, ही घटना आम्ही आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली व ऐकली.

नांदेड येथील धर्मभूषण अँड. दिलीप भाऊ ठाकूर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या नाविन्यपुर्ण उपक्रमांच्या माध्यमातून सदैव जनसेवेत, समाजसेवेत कार्यरत असतात, परंतू या वेळेस तर दिलीपभाऊंनी आश्चर्याचा व स्वाभिमाना तद्वतच् प्रखर राष्ट्रभक्तिचा असा सुखद धक्का दिला की, वाचल्यावर, पाहिल्यावर तर थोडावेळ शब्दच सुचले नाहीत, मनात ती काळ्यापाण्याची शिक्षा, वंदणिय विर सावरकरांचे समुद्राला चिरत नव्हेतर समुद्राला लाजवत असे अदम्य साहस आणि मातृभूमी विषयी असलेली प्राणाहुन ही प्रिय अशी श्रद्धा, आस्था व देशभक्ति, त्यांच्या बंदीवासातील सेल च्या आतिल बोलक्या भिंती व विनायक दामोधर सावरकर यांच्या लिखाणातील एक एक शब्द.....!

काहिही म्हणा, या ध्येय वेड्या, प्रखर राष्ट्रभक्तिने औतप्रोत ठासून भरलेला विर सावरकर प्रेमी अवलियाँ दिलीपभाऊ ठाकूर यांनी ज्या प्रकारे अंदमान बेटावर जाऊन आपल्या देशप्रमी साथीदारांना सोबत घेवून विर सावरकरांच्या पावन चरणी नतमस्तक झाले...! वाह...!दिलीपभाऊ तुम्ही व तुमचे सहकारी आपण खरोखरच भाग्यवान आहातच, ज्या उच्चपराकोटीच्या भूमिवर तुम्ही नतमस्तक झालात, हे सगळं वाचून, ऐकूण व पाहून मन प्रसन्नतर झालेच, स्वाभिमाने वक्षस्फुल्लित होऊन वंदे मातरम्, भारत माता की जय, हे अगदी जोरात आमच्या मुखातून निघाले याचे भानच राहिले नाही.दिलीपभाऊ,तुम्हासणी धर्मभूषण या ऊपाधीने सन्माणित करण्यात आलेले आहे,

पण काहि ही म्हणा,आता धर्मभूषण ही ऊपाधी आज खुप ठेंगणी वाटत आहे हो....!त्रिवार वंदन तुमच्या कार्याला व राष्ट्रभक्तिला.....!

*ने मझ शी ने मातृभूमीला.....!* हे आपल्या पुढच्या अंदमान टूर मध्ये तुमच्या मुखातून अंदमान च्या भूमीतील सेल्युलर जेल मध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना ऐकवाल. व त्याचा वृत्तांत आपल्या लेखाच्या मार्फत आमच्यापर्यंत पाठवाल अशी आशा आहे आपण ती पण पुर्ण करालच...

या अपेक्षेने येथेच थांबतो. तुर्त ऐव्हढेच.....!

*प्रा.अशोक देशपांडे , छ. संभाजीनगर*

माझ्या बऱ्याच व्हाट्सअप ग्रुप वर तुमचे प्रवास वर्णनाचे लेख व्हायरल होत होते.ते मी दररोज आवर्जून वाचत होतो.उद्या काय होईल याची उत्सुकता मनाला लागली होती.एवढ्या व्यस्त दिनचर्येत लिखाणासाठी वेळ कधी व कसे काढता ? सोबतच्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया वाचल्यानंतर माझे असे मत बनले आहे की, जेष्ठ नागरिकांची सहल सुखरूप पार पाडण्यासाठी आपण खूप मेहनत घेता. दरवेळी त्यात यश येते.याचा अर्थ दैवी शक्ती तुमच्या पाठीमागे आहे.तुमच्यावर एकही व्यक्ती नाराज नाही. मोठ मोठ्या ट्रॅव्हल्स कंपन्या भरमसाठ शुल्क आकारून देखील जे समाधान देऊ शकत नाहीत ते तुम्ही माफक दरात देता हे कौतुकास्पद आहे. तुमची समय सूचकता, हजर जबाबीपणा आणि नियोजन किती अचूक आहे याची प्रचिती वाचताना पदोपदी जाणवते. दररोजच्या लेखासोबत जर त्या दिवशीचा एखादा महत्त्वाचा फोटो छापून आला तर आणखी रंगत वाढेल. मी मराठीचा प्राध्यापक असल्यामुळे असा सल्ला देतो की, तुमचे लिखाण दर्जेदार असल्यामुळे तुम्ही तुमचे आत्मचरित्र अवश्य लिहा. तुमची लेखन शैली पाहता तुमचे आत्मचरित्र मराठी साहित्यात मोलाची भर पडेल यात शंका नाही. खूप खूप शुभेच्छा.

*नेताजी भोसले(शिवसेना उद्धव ठाकरे गट सह संपर्क प्रमुख)*

दिलीपभाऊ यांच्या अमरनाथ यात्रेचे जेव्हा दुसरे तिसरे वर्ष असेल म्हणजे २५ वर्षापूर्वी यात्रा करायचा योग आला. तेव्हाच आम्ही मित्रमंडळींनी अंदाज लावला हा माणूस इतर क्षेत्राप्रमाणे टुरिझम क्षेत्रात मोठे नावलौकिक मिळवणार. वेगवेगळ्या घरातील विविध जातीधर्माची वेगवेगळ्या स्वभावाच्या शेकडो लोकांना पंधरा वीस दिवस देशाच्या विविध भागात घेऊन जाणे हे निश्चितच सोपे काम नक्कीच नाही. परंतु अत्यंत शांत, संयमी,मृदुभाषी असलेले दिलीपभाऊ हे काम सहज पार पाडतात हा संशोधणाचा विषय आहे.जिथे जायचे त्या भागाचा कित्येक दिवस अगोदर सखोल अभ्यास करूनच तेथील सहलीचे आयोजन करायचे. एकदा दिलीपभाऊ सोबत यात्रा केलेला प्रवाशी हा कायमचा त्यांचाच होऊन जातो.ज्यांना पर्यटनाची हौस आहे त्यांनी फक्त एकदा दिलीपभाऊ सोबत प्रवास करावा. नक्कीच एक वेगळी अनुभूती मिळेल.

अंदमान निकोबार या द्विप समूहा बद्दल आजपर्यँत माहीत नसलेल्या अनेक बाबीचे या लेखमालेतून उलगडा झाला. खूपच सुंदर अश्या या लेखमालेचे पुस्तकात रूपांतर व्हावे. आपल्या सर्व उपक्रमाला मनस्वी शुभेच्छा...!!

*शेख शफी, ज्येष्ठ पत्रकार*

सर, आपल्या अंदमानच्या बेटा वरून ही लेखमाला वाचली. आपली लेखणी अतिशय सुंदर असून असे वाटत होते की, प्रत्यक्ष दृश्य समोर दिसत आहे.खूप छान माहिती देऊन आम्हाला अंदमान बेटाची संपूर्ण माहिती घरबसल्या मिळाली आहे .सर आपली आठ दिवस पूर्ण लेख मला वाचली आहे आपण अमरनाथ यात्रा व इतर कोणतीही टूर असो संपूर्ण माहिती देत असल्यामुळे आम्हाला बरीच माहिती मिळते. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद अशीच माहिती आम्हाला सांगत जा ही ही विनंती.

*अमरनाथ यात्री आनंद साताळे*

भाऊ आपण अंदमान टूरला गेल्यावर आम्हाला समजलं. पूर्वी समजले असते तर तुमच्यासोबत आला असतो. अंदमानचे सर्व भाग मला वाचायला मिळाले.ते त्याच्यानंतर आम्ही प्रत्यक्ष अंदमान टूरला गेल्याचा आनंद झाला. पुढची अंदमान टुरसाठी मी अडवान्स पाठविले आहे.आम्ही दोघे १६ जानेवारी चा अंदमान टूर जरूर अटेंड करू. आम्ही अमरनाथ यात्रा गेल्या वर्षी आपल्या सोबत केली असल्यामुळे टूरच्या नियोजनाबाबत जर बोलायचं तर आपणाला शंभर पैकी शंभर गुण दिले पाहिजे.

*बालाजी इंगोले मुखेड* 

अतिशय सुंदर मांडणी एखाद्या दर्जेदार साहित्यिकाला लाजवील अशी सत्याची ताकद म्हणजेच आपले शब्द.भाऊ तुमचे लेख क्रमश: वाचल्या नंतर असा भास होतो की, आपण एखादा चित्रपटच पाहत आहोत. इतका जिवंतपणा आपल्या लेखणीत आलेला आहे.असेच नेहमी वेगवेगळी दर्जेदार प्रवास वर्णन ने लिहीत जा. त्यामुळे ज्यांना प्रवास करायला आवडतो पण काही कारणामुळे करता येत नाही त्या असंख्य लोकांना घरी बसल्या वेगवेगळ्या टूर चा आनंद लुटता येईल .

*स्नेहलता जायसवाल, हैदराबाद*

आर्टिकल बढ़िया है। अंदमान ही है बहुत सुंदर, देखने , सोचनें समझने,और वीर सावरकर तथा अन्य कई लोगों को दि गई उनकी पीड़ा और देशभक्ति को समझने लायक हैं। चंहु ओर से पानी से घीरा हुआ सुन्दर द्विप हैं। पानी तो क्रिस्टल वाटर हैं,क्लिन्लीनेस भी अमेंझिंग है।बड़ा ही सुन्दर द्विप हैं।

आपके सभी लेख एकदम सविस्तर लिखें गये हैं। मैं तो पूणे से २०२० में जाकर आयीं थी। जैसे जैसे आपके लेख पढ़तीं हुं अंडमान ऑंखों के सामने घुमता हैं ।लेकिन जिसने भी अंडमान नहीं देखा,आपके लेख पढ़कर उसे भी अंडमान देखने का आनन्द मिलेगा।आपकी कार्यक्षमता, कार्य-प्रणाली, खनकदार आवाज, काम करने की तथा किसी भी कार्य को चुनौती पूर्ण करने की इन सब का प्रभाव इस इन आर्टिकल मे दिखाई देता हैं।जहां भी दिलीप ठाकुर होंगे, वहां सबकुछ संभव हो जाता हैं,आप जंगल में भी मंगल मनाने वाले इंसान हैं। इसीलिए हर एक यात्री की चाहत होती है कि जहां भी ट्रीप जाएं दिलीप ठाकुर साथ रहे।आप जहाँ भी जाते हो, कुछ न कुछ नयें नयें कारनामे कर्मवीरों की तरह कर दिखा देते हो। मुझे तो ऐसा लगता हैं, आपकी एक आवाज़ पर हजारों लोग आपकी मदद के लिए खुशी खुशी से आयेंगे। आप एक अविस्मरणीय जादुगर हो। सदैव ऐसे ही रहे। आपकी सेकंड यात्रा कब हैं ? ‍साथ ही एक रिक्वेस्ट हैं गुजरात, राजस्थान और मध्यप्रदेश के डिटेल्स सेंड कीजिएगा।

*नरेंद्र पटवारी (राज्य परिवहन सेवानिवृत्त अकारी)*

खुप छान शब्दात विषद केली आहे ट्रिप. वाचतांना समोर प्रसंग अनुभवल्या सारखे वाटले. पुर्वी रेडिओ वरुन क्रिकेट समालोचन ऐकताना मैदानावर कसा खेळ चालु आहे हे समजायचे. तसेच आपल्या लेखमालेतून जाणवायचे.keep it up.

*रामेश्वर वाघमारे* 

(संघटना प्रमुख,महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी संघटना)

आपले प्रसिद्ध झालेले सर्व लेख वाचले. आपण कोणतेही काम असो मग ते धार्मिक असो,सामाजिक असो,वा टुर असो नियोजन पुर्वक असतात.आपण आता एक चांगले लेखक सुध्दा झालात. कारण अंदमान च्या टुर बदल आपण जे काही लिहीत होतात ते सर्व डोळया समोर एखादा चित्रपट पाहिल्यासारखे प्रत्यक्ष पणे उभे रहात होते. त्यामुळे आम्ही या टुरचा भाग आहोत अस वाटत होते. हा आपल्या सशक्त लेखणीचा अविष्कार आहे.स्वातंत्र्यवीर सावरकर याच्या जयजयकार करताना शरीरावर रोमांच ऊभे राहात होते.कोणतही काम कसे उत्कृष्ट करावे याच उत्तम उदाहरण आपण आहात. म्हणून मी नेहमी म्हणतो *दिलीप भाऊ है तौ सब मूमकीन है* आपल्या लेखातील वर्णन वाचून कधी एकदा अंदमानला जावे अस वाटत आहे.धन्यवाद...घरी बसुन आम्हालाही अंदमान सहल घडवल्या बदल.

*संतोष अमृतराव पांडे,सिडको नवीन नांदेड*

लेखमाला वाचून सर्व वाचकांना कळले असेलच की, दिलीपभाऊ ठाकूर हे किती प्रतिभावान लेखक आहेत ते. नुसते लेखक नाही तर श्रीमान दिलीप ठाकूर साहेब हे गरीब आणि गरजू लोकांना निस्वार्थ अविरत सेवा देणारे आणि ना नफा ना तोटा या तत्वावर अमरनाथ, केदारनाथ, वैष्णव देवी , केरळ , वाघा बॉर्डर, नेपाळ पशुपतीनाथ अश्या या अनेक धार्मिक आणि पर्यटन स्थळी सांभाळून नेणे आनणे हे कार्य स्वतःचा जीव ओतून करतात . दिलीप साहेबा बदल थोडक्यात लिहिणे फार अवघड आहे , कारण त्यांचे कार्य एवढे भव्य दिव्य आहे की मोबाईल वर टाईप करता करता बोट दुखत्तील पण लिहणे संपणार नाही.

खर सांगतो मी श्रीमान दिलीप ठाकूर साहेबा सारखा माणूस किमान आजच्या काळात तर दुसरा बघितला नाही .

दिलीप ठाकूर साहेब यांना त्यांचा सदैव प्रेमी असणाऱ्या संतोष पांडेचा वाकून साष्टांग नमस्कार.

*मीना कुलकर्णी*

सर्व भाग वाचत असताना जस काही आपण प्रत्यक्षपणे त्याठिकानाचा अनुभव घेत आहोत असे सारखे वाटते. आपली लेखन शैली खुप सुंदर आहे. दिलीप भाऊ आपणाला एक विनंती आहे की,कैलास मानस सरोवर यात्रा त्वरित काढावी. कारण तुमच्यासोबत अमरनाथ यात्रा केलेली असल्यामुळे मी ठरवले आहे की,भाऊ सोबतच कैलास मानसरोवर यात्रा करायची.

*दीपा पंढरपूरकर*

खूप छान प्रवास व वर्णन...वाचल्यानंतर प्रत्यक्ष प्रसंग डोळ्यासमोर येतो.खूप सुंदर आणि सुरेख लेखनशैली...

त्यामुळे हवा हवासा वाटतो अंदमान टूर...

*नागेश भानेगावकर*

 धर्मभूषण ॲड.दिलीपभाऊ आपल्यावर भोले बाबाची विशेष कृपा असल्याने आपल्या सर्व टूर यशस्वी होतात.त्या बरोबरच सर्व टूर व यात्रा ह्या अतिशय शिस्तबद्ध असतात.तसेच योग्य नियोजना मुळेच सर्व काही निश्चितच चांगल्या प्रकारे होते. याचा अप्रतिम अनुभव आम्हाला 15 वी चारोधाम यात्रा जी 12 ते 26 मे 2024 दरम्यान आपल्या मार्गदर्शनासह आपले छोटे बंधू श्री राजेशभाऊ ठाकूर यांच्यासोबत आलेला आहेच.

कुलस्वामिनी रेणुका माता कृपेने आपल्या पुढील सर्व नियोजित यात्रा उत्तरोत्तर निश्चितच चांगल्या होतील यात काही शंका नाही. 

*दि.मा.कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक*

भाऊ,आपले अंदमानच्या बेटावरुन चे वर्णन वाचले. 

एखाद्या लेखकाला लाजवेल असे वर्णन वाचून मन भारावून गेले.अंदमानला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यात आले होते तेव्हा आम्ही अंदमानला गेलो होतो. आपल्या लेखणीमुळे आमच्या प्रवासास उजाळा मिळाला.त्रिवार धन्यवाद भाऊ.

*डॉ. संजय महाजन*

क्या बात है भाऊ,खुपच सुंदर आणि सविस्तर अस प्रवास वर्णन. हे सर्व वाचतांना मी स्वतःच तुमच्या सोबत असल्याचा फील आला.बहोत बढीया. पुढच्या वेळेला आम्ही येणारच. तुमच्या सोबत टुरला जाणे म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. याचा अनुभव आम्ही रामेश्वरम,कन्याकुमारीच्या वेळी घेतला.यावेळी सुध्दा आलो असतो पण टूर आयोजन केल्याचे कळालेच नाही.असो. पुढच्या अंदमान टुरचे डीटेल्स पाठवा.आम्हीसुध्दा बुकींग करतो.

*आनंद बाबाराव मोरे*

साहेब आपले प्रवास वर्णन मला खूप आवडते व आपले सर्व उपक्रम प्रेरणादायी असल्यामुळे मी आपला अनेक वर्षापासून चाहता आहे.असेच आपण उत्तरोत्तर कार्य करत रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

*शिवाजीराव पाटील, मुख्याध्यापक निळा*

खूप सुंदर लिखाण आहे.याचे एक छोटे पुस्तकं तयार होऊ शकते. आपल्या सर्व लेखामुळे अंदमान निकोबार बेटाची माहिती घरी बसल्या मिळाली आहे. धन्यवाद दिलीप.भाऊ

*डॉ.गोपाळ चौधरी*

दिलीपजी खूप छान लिहिता.. असंच लिहित रहा.. खूप खूप शुभेच्छा.

*नरसिंग पंजाला*

It would be enough if there was one person like you in every village sir.Our country will go like Vande Bharat trai

टिप्पण्या