मुंबई दि.३: मुंबईतील चाकरमान्यांची नाळ खेडेगावाशी जुळून आहे.तेव्हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडून येईल आणि केवळ लोककल्याणाचा मुद्दा घेऊन पुढे जाणा-या महाविकास आघाडीला सत्तेची संधी जनताच देईल,असा विश्वास डिलाईल रोडवरील कोल्हापूर ग्रामस्थांच्या स्नेहसंमेल मेळाव्यात बोलताना ठाकरे शिवसेनेचे उपनेते आमदार सचिनभाऊ अहिर यांनी दिला आहे.
कोल्हापूरच्या मुंबईतील ग्रामस्थांचे स्नेहसंमेलन नुकतेच ना.म.जोशी मार्गावरील श्रमिकजिमखाना येथे मोठ्या उपस्थितीत पार पडले.त्या वेळी अध्यक्षस्थाना वरुन आमदार सचिन अहिर बोलत होते.वरळी विधानसभा मतदारसंघात युवा नेते आदित्य ठाकरेच प्रचंड मताधिक्या ने निवडून येतील,असा विश्वासही सचिन अहिर यांनी त्यावेळी व्यक्त केला,त्याचे उपस्थित कोल्हापूरवासियांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
कोल्हापूरच्या कागल,गडहिंग्लज,उत्तुंर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे छत्रपती शाहु महाराज घराण्यातील राजे सिमरजितसिंह घाडगे उमेदवारी करीत आहेत.त्यांच्या स्वागतासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नव्या विकासाचे व्हिजन घेऊन पुढे आलेल्या राजे समरजितसिंह घाडगे यांना शुभेच्छा देऊन,आमदार सचिन अहिर गिरणी कामगारांच्या प्रश्नाकडे वळून म्हणाले,राज्य सरकारने गिरणी कामगार प्रश्न सोडवणुकीसाठी नियुक्त केलेल्या समितीच्या अध्यक्षस्थानावरून बोरीवलीतील आमदार गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नाला काय न्याय देणार?असा सवाल करून आमदार सचिन अहिर म्हणा ले,या सरकारने गिरणी कामगारांसाठी एकही घर नव्याने बांधलेले नाही. विका साच्या मुद्यावर मुंबईतून निघालेल्या परिवर्तनाच्या लाटेला आता ग्रामीण पातळीवरही कोणीच आडवू शकणार नाही,असेही सचिन अहिर आपल्या भाषणात म्हणाले.
राजे समरजितसिंह घाडगे आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात म्हणाले, आपल्या मतदार संघाचा रखडलेला आरोग्य,शेती विषयक विकास आपण करणार आहोत,लोककल्याण हाच आपला ध्यास आहे,असेही राजे समरजितसिंह घाडगे आपल्या भाषणात म्हणाले.
याप्रसंगी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर,स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी आपल्या भाषणात विकासाचे व्हिजन घेऊन पुढे आलेल्या राजे समरजितसिंह घाडगे यांना शुभेच्छा दिल्या.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई यांच्या प्रयत्नाने हा स्नेहसं मेलनाचा यशस्वी मेळावा पार पडला.मेळाव्याला मा.नगरसेवक सुनिल अहिर, बाळासाहेब गुजर,रवि देसाई,शशिकांत पाटील, संतोष लोकरे,आदी राजकीय,सामाजिक सहकार,शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते•••••
addComments
टिप्पणी पोस्ट करा