जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सानपाडा विरूंगळा केंद्रास उत्कृष्ट केंद्राचे पारितोषक*


जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ०१ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई महापालीकेतर्फे  विष्णुदास नाट्यगृहामध्ये  नवी मुंबईचे शिल्पकार व माजी मंत्री मा.श्री.  गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक दिन संपन्न झाला. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांच्या विविध कलागुण दर्शविणारा सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ज्या ज्येष्ठ नागरिकांना लग्नाची ५०  वर्ष ( सुवर्ण महोत्सव) व वयाची ७५ वर्ष ( अमृत महोत्सव ) पूर्ण झाली होती,  त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. ज्येष्ठांनी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.  नवी मुंबईत ३४ ज्येष्ठ नागरिक  विरंगुळा केंद्र असून सानपाडा विरंगुळा केंद्रास उत्कृष्ट केंद्राचे पारितोषक मिळाले असून,  या केंद्रातील ज्येष्ठांनी  विविध स्पर्धांमध्ये  मा. श्री. गणेश नाईक यांच्या शुभहस्ते सर्वात जास्त ११ पारितोषिके  प्राप्त केली आहेत. यामध्ये कॅरम महिला स्पर्धेत श्रीमती शालन देशमुख यांना प्रथम क्रमांक तर श्रीमती विजया हेब्बाळकर यांना दुसरा क्रमांक मिळाला आहे. बुद्धिबळ स्पर्धेत रमेश मोहिते यांना प्रथम क्रमांक,  एकपात्री अभिनय स्पर्धेत चंद्रकांत शिंदे यांना प्रथम क्रमांक तर राम काजरोलकर यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे. काव्यवाचन स्पर्धेत डॉ. विजया गोसावी यांना प्रथम क्रमांक तर राम काजरोलकर यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे. हास्य स्पर्धेत जगदीश एकावडे यांना द्वितीय क्रमांक, टेलिफोन स्पर्धेत प्रशांत मोकाशी यांना द्वितीय क्रमांक तर  पत्रलेखन स्पर्धेत उत्तरा माने यांना प्रथम क्रमांक तर  मारुती कदम यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे. नवी मुंबई महानगर पालिकेतर्फे देण्यात आलेल्या बक्षिसांमध्ये  प्रथम क्रमांकास तीन हजार रुपये,  द्वितीय क्रमांकास दोन हजार रुपये,  तृतीय क्रमांकास एक हजार रुपये, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र होते. जागतिक ज्येष्ठ  नागरिक दिनानिमित्त सर्व  उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.

असे मारुति विश्वासराव यांनी कळविले  आहे.

टिप्पण्या