नांदेड/प्रतिनिधी
वीरशेव लिंगायत समाज खऱ्या अर्थाने नावा प्रमाणे वीर, भक्तीमध्ये लीन देखील आहे, ज्यावेळी समाजामध्ये जातीपातीमुळे विषमता निर्माण झाली होती तेव्हा महात्मा बसवेश्वरांनी समतायुक्त समाज निर्माण करण्याचे कार्य करून लिंगायत समाजाला खऱ्या अर्थाने दिशा दिली. महात्मा बसवेश्वरांचे व्यक्तिमत्व आभाळाएवढे मोठे होते या व्यक्तिमत्वाला साजेसे असे भव्य स्मारक मंगळवेढा येथे उभारण्यात येईल, एवढेच नव्हे तर समाजाने आणि खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी आपल्यासमोर ठेवलेल्या सर्व मागण्यांची पूर्तता करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो अशी ग्वाही,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
खासदार डॉ.अजित गोपछडे यांच्या नेतृत्वाखाली भक्तीस्थळ ते शक्तिस्थळ असा प्रवास करून वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचा समारोपीय संकल्प सोहळा सोमवारी मंगळवेढा येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले लिंगायत समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या आर्थिक विकास महामंडळाची व्याप्ती वाढवून ती संपूर्ण लिंगायत समाजासाठी करण्यात आली आहे. महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या मागणीसोबतच संत चोखामेळा यांच्या स्मारकाचीही मागणी लिंगायत समाजाने केली, याचा आनंद व्यक्त करून श्री फडणवीस यांनी महात्मा बसवेश्वरांनी दिलेल्या शिकवणीमुळेच खरा लिंगायत समाजाचा विचार या मागणीच्या माध्यमातून पुढे आला, याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदनही केले. फडणवीस म्हणाले, विदेशात गेल्यानंतर भारतात लोकशाही किती जुन्या काळात अस्तित्वात आली होती, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा बसवेश्वरांचे नाव घेत भारतीय लोकशाहीचे मूलतत्त्व आणि लोकशाहीचे महत्त्व युरोपीय लोकांना नेहमीच सांगत असतात.
प्रारंभी वीरशैव लिंगायत समाजातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवाचार्य विरुपाक्ष महास्वामीजी, ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर,,गुरूवर्य श्री. ष. ब्र.प्र. 108 विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर, नितीन शेटे,बसवराज पाटील अर्चनाताई चाकूरकर, आ. विजयकुमार देशमुख, आ. कल्याण शेटे, आ. समाधान अवताडे, आ.सुभाष बापू देशमुख, मा. खा.रणजीत सिंह नाईक निंबाळकर ,आ .गोपीचंद पडळकर, आ .राम सातपुते, एस.पी.पाटील, श्रावण जंगम, श्रीशैल अवतुरे, यांच्यासह वीरशैव लिंगायत समाज बांधव व भगिनी युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
addComments
टिप्पणी पोस्ट करा