सेलू (दि. ) क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणी व नूतन महाविद्यालय सेलू यांच्या वतीने विभागीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धा सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या इनडोअर क्रीडा हॉल मध्ये दि. ८ ऑक्टोबर रोजी नूतन विद्यालय शिक्षण संस्था कार्यकारिणी सदस्य राजेश गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.
सदरील क्रीडा स्पर्धेत १४/१७/१९ वर्षे आतील मुले मुली गटात छत्रपती संभाजी नगर विभागातील प्रत्येकी गटात सात संघांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धा पारंपरिक , कलात्मक, तालात्मक अशा तीन प्रकारात घेण्यात आल्या यात 297 खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
या स्पर्धेतून निवडण्यात आलेला संघ येणाऱ्या शालेय राज्यस्तरीय योगासन क्रीडा स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर विभागाची प्रतिनिधित्व करणार आहे.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. उत्तम राठोड म्हणाले योगासन हा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समाविष्ट करण्यात आला आहे. योगासना क्रीडा प्रकारात आज शिवछत्रपती पुरस्कार देण्यात येत आहेत. आशियाई स्तरावर योगासन क्रीडा स्पर्धेत समाविष्ट करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नूतन महाविद्यालय प्राचार्य डॉ उत्तम राठोड, उद्घाटक नू.वि.शि.सं. कार्यकारिणी सदस्य राजेश गुप्ता, प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन सचिव उदय कहाळेकर, छत्रपती संभाजीनगर जिल्हा सचिव सुरेश मिरकर, पर्यवेक्षक प्रविण सोनवणे, राज्य सचिव टेनिस व्हॉलीबॉल गणेश माळवे, प्रा.के.के.कदम, तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक उपस्थित होते.प्रास्ताविक योगासन स्पोर्ट्स असोसिएशन सचिव डी डी सोन्नेकर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा नागेश कान्हेकर, तर आभारप्रदर्शन प्रा. सुष्मा सोनी यांनी मानले मानले.
याप्रसंगी सर्व योगासन पंचांचे यथोचित सत्कार करण्यात आले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा