मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे नवनिर्वाचित बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे यांची १२ ऑगस्ट २०२४ रोजी पहिली बोर्ड मिटिंग असल्यामुळे त्यांचा युनियनच्या वतीने मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे चेअरमन राजीव जलोटा व डेप्युटी चेअरमन आदेश तितरमारे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन बोर्ड रूम मध्ये सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक जनरल एम्पलॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, सेक्रेटरी व माजी बोर्ड मेंबर दत्ता खेसे, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी केरसी पारेख, युनियनच्या खजिनदार व बोर्ड मेंबर कल्पना देसाई, युनियनचे पदाधिकारी मनीष पाटील, विकास नलावडे, शीला भगत, रमेश कुऱ्हाडे, मारुती विश्वासराव, संदीप चेरफळे, प्रवीण काळे, आप्पा भोसले, बबन मेटे, बापू घाडीगावकर, वाडेकर, बोर्ड मेंबर्स, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या वतीने चेअरमन राजीव जलोटा यांनी नवीन बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा