नांदेड/प्रतिनिधी - शहरापासून हाकेच्या अंतरावर बहुप्रतिष्टीत नागरिकांची यशविहार कॉलनी वाडी (बुद्रुक) येथे निर्माण करण्यात आली आहे. या वसाहतीच्या निपुना डेव्हलपर्सच्या निर्मात्यांनी खोटी कागदपत्रे सादर करून अनधिकृतपणे वसाहत निर्माण केल्याची तक्रार करण्यात आली असून त्यामुळे सदर वसाहत अनधिकृत ठरवून त्यावर हातोडा पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
नांदेड तालुक्यातील मौजे वाडी (बुद्रुक) येथील सर्वे क्रमांक 28 मध्ये यशोविहार कॉलनी वसाहत निर्माण करण्यात आली आहे. या वसाहतीचे निर्माते निपूना डेव्हलपर्सचे भागीदार व संचालक विनोद श्रीरामवार आहेत. त्यांनी मूळ मालकाकडून 2009 साली विक्री खताआधारे 26 एकर जमीन खरेदी व ताब्यात घेतली होती. सदर जमीन ही इनामी जमीन आहे या जमिनीचा वापर अकृषीक कारणासाठी केला जाऊ शकत नाही. हे महसूल अधिनियम सांगतो परंतु निपुणा डेव्हलपर्सचे विनोद श्रीरामवार यांनी खोटी कागदपत्रे सादर करून बनावट अकर्षिक परवाना सादर करून व्यावसायिक उद्देशाने बनावट लेआउट करून यशविहार कॉलनीची वसाहत निर्माण केली आहे. या वसाहतीमध्ये 300 प्लॉटचे तुकडे लेआउट आधारे निर्माण करून जवळपास 100 आलिशान बंगले बांधून लाखो रुपये किमतीने विक्री केली आहेत. त्यातून निपूना डेव्हलपर्सचे श्रीरामवार यांनी कोट्यावेधीचा लाभ मिळविला आहे. परंतु बनावट ले आऊट व एन ए आधारे प्लॉट विक्री करून श्रीरामवार यांनी कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडविला असल्याची तक्रार वाडी (बुद्रुक ) ग्रामपंचायतचे सदस्य रामभाऊ माधवराव पावडे यांनी जिल्हाधिकारी व छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागीय आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनामध्ये रामभाऊ पावडे यांनी सांगितले आहे की हे बनावट एनए आधारे प्लॉट निर्मिती करण्यासाठी त्यांना तत्कालीन तहसीलदार किरण अंबेकर, जीवराज डापकर, महेश वडदकर तसेच ग्रामविकास अधिकारी अमृता शिंदे यांना देखील लाचेच्या स्वरूपामध्ये स्वतंत्र बंगलो भेट करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
वाडी बुद्रुक शेत सर्वे नंबर 28 या इनामी जमिनीच्या बनावट अकर्षिक परवाना निर्माण तयार करून शासन व ग्राहक नागरिकांची फसवणूक करणाऱ्यां निपूना डेव्हलपर्स व त्यांना सहकार्य करणारे तत्कालीन सरपंच बंडू भाऊराव पावडे व ग्राम विकास अधिकारी अमृता शिंदे यांच्यासह त्यांना सहकार्य करणाऱ्या महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रामभाऊ पावडे यांनी त्यांच्या तक्रारीत केली आहे. नागरिकांची यशविहार कॉलनी वाडी बुद्रुक येथे निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे सदर वसाहत अनधिकृत ठरवून त्यावर हातोडा पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा