आजच्या स्पर्धात्मक युगात ग्राहक संस्थांना नवे मार्ग शोधावे‌‌ लागतील! सचिन अहिर यांचे प्रतिपादन




     मुंबई दि.७:आजच्या सहकारी ग्राहक संस्थांना स्पर्धात्मक युगातून

 पुढे जाताना अनेक आव्हानाना सामोरे जावे लागत आहे.मात्र‌ यातून मार्ग काढतांना आपले अस्तित्व गमावून चालणार नाही.त्यासाठी नवे‌ क्षेत्र निवडावे लागतील,असा विश्वास राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष शिवसेनेचे उपनेते आमदार सचिनभाऊ अहिर यांनी येथे‌‌ बोलताना व्यक्त केला.

     राष्ट्रीय मजदुर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघाची ४९‌ वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल‌‌ महात्मा गांधी सभागृहात पार पडली.त्यावळी आमदार सचिनभाऊ अहिर प्रमुख सल्लागार म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव मोहिते होते.गिरण गावातील‌ जुनी आणि नामवंत संस्था म्हणून ओळख असलेल्या या ग्राहक संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला गिरणी कामगार सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी ग्राहक संस्थेचा वार्षिक नफा-तोटा अहवाल आवाजी मताने संमत करण्यात आला.         

    संस्थेचे प्रमुख सल्लागार आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन‌भाऊ अहिर आपल्या भाषणात पुढे म्हणाले,आज साधे पेन‌ हवे असेल तर ते क्षणभरात ऑन लाईन उपलब्ध होऊ शकते! अशा अनेक गृहपयोगीवस्तू‌‌ उपलब्ध करून‌ देण्यासाठी अनेक व्यवसायिक व्यापारी कंपन्यांचे पेव‌ फुटले‌ आहे.आज ग्राहकाला कोणतीही वस्तू ऑन लाईन माफक दरात संहज उपलब्ध होऊ शकत आहे.अशा या स्पर्धात्मक वातावरणात सहकारी संस्थां वृध्दिंगत कशा करता येणार आहेत? असा प्रश्न करून आमदार सचिनभाऊ अहिर म्हणाले, अशा या स्पर्धात्मक वातावरणात आजच्या ग्राहक संस्थाना,पतसंस्था‌, व्यावसायिक तत्वावर आधारित ग्राहक केंद्र उभारणी सारखे नवे उपक्रम शोधावे‌‌‌ लागतील,असे‌ही सचिनभाऊ अहिर आपल्या भाषणात म्हणाले.

    रखडलेल्या गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर सचिन‌भाऊ अहिर म्हणाले,विद्यमान राज्य शासनाने उध्दव ठाकरे सरकारने सोडतीत लागलेली घरांचे फक्त वाटप केले आहेत.या सरकारने एकही नवीन घर बांधलेले नाही.या प्रश्नावर आम्ही विधान परिषदेत सरकारशी भांडत आहोत.मात्र महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर नक्कीच या प्रश्नाला प्राधान्य दिले जाईल,कसेही सचिनभाऊ अहिर आपल्या भाषणात म्हणाले. 

     संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव मोहिते म्हणाले,पुढील वर्षी संस्था सुवर्ण महोत्सव साजरा करीत असून, ग्राहक संस्थेच्या समृद्धी आणि विकासासाठी आम्ही नव्या संकल्पना अधोरेखिल्या आहेत.ग्राहकाचे हित आणि पारदर्शकता हेच आमचे ब्रीद असून ते कायम जोपा सण्याचा आम्ही निर्धार केला आहे,असेही गोविंदराव मोहिते आपल्या भाषणात म्हणाले.या प्रसंगी सदस्यांच्या १० वी १२ उत्तीर्ण मुलांना किंवा नातवंडांना शैक्षणिक साहाय्य देऊन गौरविण्यात आले.

   सर्वश्री निवृत्ती देसाई,रघुनाथ अण्णा शशिर्सेकर,बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर,शिवाजी काळे,मारुती शिंत्रे महाव्यवस्थापक विलास डांगे,शोभा परब,आशा आसबे, बळीराम महाडिक या संचालकांनी संस्थेच्या कामकाजात भाग घेतला.आबेकर श्रमसंशोधन‌‌ संस्थेचे संचालक जी.बी.गावडे,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उपाध्यक्ष लालीभाऊ सुनिल अहिर विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते.•••••

टिप्पण्या
Popular posts
उमरी तालुक्यातील बोरजूनी येथे प्रेम प्रकरणातून प्रियकर व मुलींची वडिलांकडून हत्या
इमेज
योद्धा जेव्हा शरण येत नाही तेव्हा तो बदनाम केला जातो ; महेबूब भाई आम्ही तुमच्या सोबत आहोत ! - शेख फेरोज
इमेज
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या विजयी उमेदवारांना दिल्या शुभेच्छा*
इमेज
वि. स. पागे:रोजगार हमी योजनेचे जनक* भारतातील रोजगार हमी योजनेचे जनक कै. वि. स .पागे यांची २१ जुलै रोजी जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा हा गौरवास्पद आलेख ..
इमेज
डाॅ.लोपामुद्रा,आपण महाराष्ट्र पोलीस दलाचीच नव्हे तर भारतीय पोलीस दलाची "डाॅ.विजश्री लोपामुद्रा" आहात!...डाॅ.हंसराज वैद्य...*
इमेज