अहमदनगर येथे अध्यात्मिक गुरुकुल आश्रमातील लहान मुलांना विविध वस्तूंची भेट*

*सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला "आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" या  समूहाच्या वतीने ३० जून २०२४ रोजी शिर्डी, राहुरी, नगर, उंबरे या गावी विश्व माऊली अध्यात्मिक गुरुकुल या आश्रमात लहान मुलांस गरम पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सोलर पॅनल, अन्नधान्य, शालेय वस्तू, रोख रक्कम तसेच आश्रमच्या पटांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणुन शिवसेना युवासेना तालुका प्रमुख राहुल जुवाडी,  सचिन मोरे, राहुल मोरे, ग्रुपचे संस्थापक, संचालक, अध्यक्ष, सेक्रेटरी, सल्लागार व ग्रुप मधील ७० ते ८० सदस्य उपस्थित होते. आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या ग्रुपच्या वतीने समाजसेवे अंतर्गत हा २२ वा उपक्रम साजरा करण्यात आला. या आश्रमचे सर्वेसर्वा दुशिंग महाराज यांनी आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या ग्रुपचे संस्थापक संतोष पाटील यांचे मनापासून आभार व्यक्त करून त्यांचा व सौ.सोनिया वहिनी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.*

टिप्पण्या