यशवंत मध्ये सहा दिवसीय आर्ट ऑफ लिविंग विकास कार्यक्रम उत्साहात संपन्न*


 नांदेड:(दि.८ जुलै २०२४)

          श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने सहा दिवसीय द आर्ट ऑफ लिविंग: प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

           दि.२ जुलै ते ७ जुलै दरम्यान महाविद्यालयाच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये श्री.शिवा बिरकले यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी सुदर्शन क्रिया, विविध योगासने तसेच मानवी मूल्यांची संबंधित मार्गदर्शन करण्यात आले.

           या शिबिरात उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, डॉ.शिवराज बोकडे, डॉ.साईनाथ बिंदगे, प्रा.माधव दुधाटे, डॉ.कैलास इंगोले, डॉ.रमेश चिल्लावार, डॉ.दत्ता कवळे, डॉ.शिवाजी सूर्यवंशी, प्रा.प्रवीण तामसेकर, प्रा.शांतुलाल मावसकर, डॉ.मनोज पैंजणे, प्रा.भारती सुवर्णकार, प्रा.प्रियंका सिसोदिया, प्रा.संकेत देलमाडे, डॉ.अर्जुन गुरखुदे, डॉ.दिपाली नालमवार, डॉ.संगीता मसारे, प्रा.ज्योती भोसकर, डॉ.मनीषा तांदळे, प्रा.एल.एच.सरपाते, प्रा.एस एस खोडवे, डॉ.के.जी. गायकवाड, प्रा.आय.एन. जयस्वाल, प्रा.ए.के. जाधव आदींनी सक्रियतेने या शिबिराचा लाभ घेतला.

          या शिबिराच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.

टिप्पण्या