आषाढी वारी म्हणजे वारकऱ्यांसाठी एक पर्वणीच होय. वारकरी सांप्रदाय पंढरपूरच्या विठ्ठलाच्या वारीला पायी जाण्यासाठी सदैव तत्पर असतो. वारकरी सांप्रदायामध्ये आषाढी वारीला अनन्यसाधारण महत्त्व असून अनेक जाती - धर्माचे लोक या वारीमध्ये सहभागी होतात. आषाढी वारीचा सोहळा हा भक्तांसाठी पर्वणीच असून या पर्वणीचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने महसूल विभागात ‘हेचि दान देगा देवा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १६ जुलै रोजी लातूर येथील दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची संकल्पना श्री. सुधीर मुनगंटीवार, मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य यांची असून मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य सचिव श्री. विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले आहे. देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त ‘हेचि दान देगा देवा’ अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम येत्या मंगळवारी १६ जुलै २०२४ रोजी दयानंद सभागृह लातूर या ठिकाणी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास ‘झी युवा’ संगीत सम्राट महाविजेता रवींद्र खोमणे, ‘सुर नवा ध्यास नवा’ उपविजेती श्रावणी महाजन, ‘मी होणार सुपरस्टार’ फेम संज्योती जगदाळे (गायिका), विठ्ठल बावीस्कर (निवेदिता) यांची विशेष उपस्थिती असणार असून, गायकांच्या ओघवत्या व रसाळ वाणीतून संचलनात्मक हा कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी केले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा