नांदेड : महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व माजी मुख्यमंत्री तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख माधव पावडे यांच्या पुढाकारातून दिनांक 2 जुलै ते 28 जुलै या कालावधीत नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी आणि नेत्ररोगी रुग्णांसाठी मोफत नेत्ररोग तपासणी आणि मोतीबिंदू शास्त्रीक्रियेचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराची सुरुवात आज पुयणी येथून करण्यात आली असून पहिल्याच दिवशी 238 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. पैकी 24 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया उदगीर येथे लायन्स क्लबच्या नेत्रालय रुग्णालयात करण्यात येणार आहे.
सहसंपर्कप्रमुख शिवसेना भुजंगदादा पाटील ,जिल्हा प्रमुख शिवसेना माधवभाऊ पावडे, ,जिल्हा संघटक नेताजी भोसले ,माजी सभापती नरहरी वाघ , महानगरप्रमुख पप्पू जाधव , माजी नगरसेवक मुकुंद जवळगावकर , कामगार सेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब पावडे ,उप जिल्हाप्रमुख व्यंकोबा येडे ,उपजिल्हा प्रमुख विजय बगाटे ,तालुकाप्रमुख गणेश शिंदे , चंद्रकांत भोसले, पुयणीचे माजी सरपंच बाबुराव पावडे , प्रकाश महाराज पुयणीकर,दर्यापूरचे सरपंच विलास सुर्यवंशी , संजयराव पावडे, उपशहर प्रमुख बंडू देशमुख, मनोहर लोलगे,काशिनाथराव पावडे, इस्माईल शेख, बेगाजी पावडे, परसराम पावडे, मारोतराव पावडे, युवासेना उपजिल्हा प्रमुख संतोष पावडे , प्रल्हाद पावडे, नवज्योतसिंग, शिवाजी पावडे, अभिजित भालके, बंटी पावडे, सुनिल पावडे, नारायण पावडे, गोविंद किरकण, सुदाम आव्हाड आदींची यावेळी उपस्थिती होती.
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस येथे 28 जुलै रोजी महाराष्ट्रभर विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे. तत्पूर्वी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून जिल्हाप्रमुख माधव पावडे यांच्या पुढाकारातून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील नेत्ररोगी रुग्णांसाठी तब्बल 26 दिवस नेत्ररोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे . शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात या नेत्ररोग तपासणी शिबिरचे आयोजन करण्यात आले असून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात हे शिबिर राबविले जाईल असा माहिती माधव पावडे यांनी दिली आहे . ज्या रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे त्यांना उदगीर येथील लायन्स क्लबच्या रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी जाण्या - येण्याचा तेथील विविध आरोग्य तपासण्या शिबिराचे आयोजक तथा जिल्हाप्रमुख माधव पावडे हे स्वतः करणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक तथा जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी केले आहे .
पहिल्याच दिवशी 238 रुग्णांची तपासणी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नेत्ररोग तपासणी शिबिराच्या पहिल्याच दिवशी तब्बल 238 रुग्णांची नेत्ररोग तपासणी करण्यात आली आहे . पैकी 24 रुग्ण मोतीबिंदू ग्रस्त असल्याचे आढळून आले असून त्यांच्यावर उदगीर येथील लायन्स नेत्र रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
addComments
टिप्पणी पोस्ट करा