रा.मि.म.संघाच्या सहकारी ग्राहक संघाचे माजी संचालक सी.टी सावंत यांचे‌ निधन!*

    मुंबई दि.३:राष्ट्रीय मजदूर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघाचे माजा संचालक सी.टी‌.सावंत‌ यांचे काल मुंबईत वार्धक्यात निधन झाले (७५ ).त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुली‌ असा कुटुंब परिवार आहे. ते‌ बंद दिग्वीजय‌‌ मिल‌ मधील राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे प्रतिनिधी होते. सहकार चळवळीत सक्रिय असलेल्या सी.टी.सावंत यांचे संघाच्या सहकारी ग्राहक संघाच्या कार्यात महत्त्वाचे योगदान  राहिले आहे. संघटनेच्या अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे.त्यांच्या आकस्मिक निधना बद्दल संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी शोक व्यक्त केला आहे.सहकारी ग्राहक संघाचे अध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी सी.टी.सावंत यांच्या निधना बद्दल शोक व्यक्त करताना म्हटले आहे,सहकारी चळवळीतील त्यांचे योगदान कदापि विसरत येणार नाही.राष्ट्रीय मजदूर मध्यवर्ती ग्राहक संघाचे पदाधिकारी आणि कार्यकारिणीनेही सी.टी.सावंत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.•••••

टिप्पण्या