'यशवंत ' मधील डॉ.संदीप पाईकराव यांना भूटान येथे 'आंतरराष्ट्रीय मानस हिंदी-सेवी सम्मान' प्रदान*



नांदेड: (दि.१० जून २०२४)

         श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख प्रो. डॉ. संदीप श्रीराम पाईकराव यांची पूर्वोत्तर हिंदी अकादमी, शिलाँगच्या वतीने पर्वतीय देश भूतानच्या थिंपू, पारो, फुटशोलिंग या शहरात दि.५ ते १० जून दरम्यान आयोजित आंतरराष्ट्रीय चर्चासत्र तथा लेखक मिलन शिबिरासाठी निवड करण्यात आली होती. अहिंदी प्रदेशामध्ये गेल्या २२ वर्षापासून हिंदी भाषा व हिंदी साहित्य क्षेत्रातील लेखन व अध्यापन योगदानाबद्दल त्यांना प्रसिद्ध हिंदी साहित्यकार डॉ. मीना परिहार, श्रीमती शील कौशिक आणि डॉ. अकेला भाई यांच्या हस्ते 'आंतरराष्ट्रीय मानस हिंदी-सेवी सम्मान' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

           या सन्मानाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे,  अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही.पद्माराणी राव, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील,  अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ. साईनाथ शाहू, संशोधन समिती समन्वयक डॉ.एम.एम.व्ही. बेग, प्रसिद्धी समिती समन्वयक डॉ. अजय गव्हाणे, सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या
Popular posts
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
नांदेड : अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉ. लता गायकवाड यांची राज्य कमिटीच्या सचिव मंडळ सदस्यपदी नुकतीच निवड झाली आहे.
इमेज
माहूर शहरात क्रांतिसूर्य बिरसामुंडा यांची जयंती विवीध ठिकाणी साजरी.
इमेज
वेतन करारात मान्य केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी गोदी कामगारांची सरकारविरोधात तीव्र निदर्शने*
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज