*गोदी कामगारांना मिळालेले फायदे टिकविणे हेच कामगार चळवळी समोर मोठे आव्हान*

स्वातंत्र्य सेनानी, मुंबईचे माजी महापौर,  माजी खासदार व ज्येष्ठ कामगार नेते डॉ. शांती पटेल यांनी ७० वर्ष बंदर व गोदी कामगार चळवळीचे  नेतृत्व करून ६२  वर्ष मुंबई पोर्ट ट्रस्टच्या विश्वस्तपदी काम केले. त्यांच्या दूरदृष्टीकोणामुळे व अभ्यासू  वृत्तीमुळे आज गोदी कामगारांना चांगला पगार,  पेन्शन, हॉस्पिटल इ.फायदे मिळत आहेत.

गोदी कामगारांना मिळालेले फायदे टिकवणे हेच आज कामगार चळवळी समोर मोठे आव्हान आहे. असे  सर्वच वक्त्यांनी आपल्या अभिवादनपर भाषणात सांगितले.

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने १३  जून  २०२४ रोजी डॉ. शांती पटेल यांचा १०  वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.  स्मृतिदिनानिमित्त ऑरेंज गेट प्रिन्सेस डॉक जवळील डॉ. शांती पटेल चौकातील नाम फलकाला  पुष्पहार घालण्यात आला.  तर माझगाव येथील कामगार सदन कार्यालयातील डॉ. शांती पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 

 डॉ.  शांती पटेल यांनी आपल्या कार्यकाळात कामगारांमधून कामगार नेते व  कार्यकर्ते निर्माण केले आहेत. डॉ. शांती पटेल यांचा समाजात,  राजकारणात व कामगार चळवळीत आपल्या कार्याने चांगला प्रभाव होता. ते नेहमी सांगायचे उद्योग टिकला तर कामगार टिकेल,  कामगार टिकला तर संघटना टिकतील.  कामगारांच्या मागण्या या  कुणाच्या मेहरबानीमुळे नाही तर कामगारांच्या एकजुटीमुळेच  मिळतात.  डॉ.  शांती पटेल यांच्या दूरदृष्टीकोणामुळे व अभ्यासू  वृत्तीमुळे कामगारांचा व बंदरांचा विकास झाला आहे.

 स्मृतिदिन  सभेमध्ये युनियनचे अध्यक्ष  ॲड. एस. के. शेट्ये, कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल,  जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज,  सेक्रेटरी विद्याधर राणे, दत्ता खेसे,  विजय रणदिवे,  खजिनदार विकास नलावडे,  उपाध्यक्ष रमेश कुऱ्हाडे,  प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव,  माजी उपाध्यक्ष संदीप कदम, संघटक चिटणीस निसार  युनूस मिर , मुंबई  टांकसाळ  मजदूर सभेचे पदाधिकारी मुकुंद वाजे,   कार्यकर्त्या  योगीनी दुराफे,  महेंद्र चौगुले,  कार्यकर्ते अप्पा  सूर्यवंशी, वैद्यकीय  खात्यातील सेवानिवृत्त कार्यकर्ते अशोक डफळ आदी  मान्यवरांची  डॉ. शांती पटेल यांचे कार्य व आठवणीच्या आधारावर भाषणे झाली. 

याप्रसंगी युनियनचे पदाधिकारी  मनीष पाटील,  विष्णू पोळ,  प्रदीप नलावडे, संदीप चेरफळे, प्रवीण,  काळे, आप्पा भोसले व कार्यकर्ते व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते

आपला 

 मारुती विश्वासराव 

प्रसिद्धीप्रमुख 

 मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

टिप्पण्या