एसटी कामगारांच्या व्यथा खेळ मांडीयेला नवा कथेतून मांडल्या बद्दल लेखक काशिनाथ माटल यांचा गुणगौरव!*

    मुंबई दि.२९:ज्येष्ठ कथालेखक आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे जनसंपर्क अधिकारी काशिनाथ माटल यांनी एसटी कामगारांच्या व्यथा "खेळ मांडीयेला नवा" या कथेतून मांडल्या बद्दल महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतिने मंगळवार‌‍ दि २ रोजी परेलच्या टिळक भवन मध्ये ह्रुद्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे.सदर कथेचे शीर्षक असलेल्या या कथा संग्रहाला राज्यातून तीन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत कथा लेखक काशिनाथ माटल यांना सन्मानित करण्यात येणार आहे.या प्रसंगी एसटी कामगारांच्या  प्रशिक्षण शिबिरात उद्योग आणि एसटी कामगारांच्या भवितव्याच्या दृष्टीने शिबिरात विविधांगी चर्चा होईल,असे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या