*बंदर व गोदी कामगारांचा वेतनकरार लवकरच होईल* - राजीव जलोटा



भारताच्या प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांना १  जानेवारी २०२२  पासून लागू होणारा वेतन करार लवकरच होईल,  असे स्पष्ट उद्गार इंडियन पोर्ट असोसिएशन व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे चेअरमन श्री. राजीव जलोटा यांनी जाहीर सभेत काढले.

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने  युनियनचे सेक्रेटरी व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर श्री. दत्ता खेसे यांचा सेवा निवृत्ती निमित्त सन्मान सोहळा २८ जून २०२४  रोजी भाऊचा धक्का येतील पॅसेंजर टर्मिनल हॉलमध्ये ज्येष्ठ कामगार नेते  ॲड . एस.के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. चेअरमन श्री. राजीव जलोटा  व ॲड. एस.के. शेट्ये यांच्या हस्ते युनियनच्या वतीने दत्तात्रय सोपान  खेसे यांना पत्निसमवेत शाल, श्रीफळ,  पुष्पगुच्छ, संपुर्ण पोशाख, मानपत्र, सन्मान चिन्ह व  भेटवस्तू देऊन त्यांचा  सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. विविध खात्यातील कामगारांनी त्यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान केला.

याप्रसंगी राजीव जलोटा यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले की,  वेतन करारातील बरेच प्रश्न सुटले आहेत. मूळ पगारात महागाई भत्ता समाविष्ट करणे आणि अधिकाऱ्यांपेक्षा कामगारांचा पगार जास्त असता कामा नये या दोन गोष्टी बाकी आहेत त्यापैकी महागाई भत्ता विलीन करायचे जवळजवळ मान्य झाले आहे. काही अडचण आहे त्यासाठी बक्षी कमिटीकडे एक अहवाल दिला आहे.तो अहवाल आल्यानंतर लगेचच फेडरेशनच्या नेत्यांना बोलवून वेतन करार करण्याचा मार्ग काढला जाईल.

 दत्ता खेसे  यांनी बोर्ड मिटिंगमध्ये कामगारांची बाजू उत्कृष्टपणे मांडली आहे. काही चुकीच्या दुरुस्तीही करण्यात आल्या. आम्हालाही खूप शिकायला मिळाले. त्यांनी अनेक कामगारांचे प्रश्न सोडविले आहेत. म्हणूनच ते कामगारांमध्ये लोकप्रिय झाले आहेत.  मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं. त्यांनी यापुढेही त्यांचं आवडीचं काम करावं. त्यांना सेवानिवृत्ती निमित्त मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

ज्येष्ठ कामगार नेते ॲड.एस. के. शेट्ये यांनी आपल्या  शुभेच्छापर  भाषणात सांगितले की, गोदी विभागातील कामगारांनी व अधिकार्‍यांनी आम्हाला दत्ता खेसे यांच्यासारखा चांगला कार्यकर्ता दिला.  त्यांनी देखील बोर्डामध्ये कामगारांची बाजू समर्थपणे मांडली. ते माझ्या मुलासारखे आहेत,  त्यांनी मला मुलाचं प्रेम दिलं. दत्ता खेसे हे एक  प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. कामगारांचे अनेक प्रश्न मांडून त्यांनी  कामगारांना न्याय मिळवून दिला. म्हणूनच ते प्रत्येक खात्यात लोकप्रिय झालेले आहेत. ज्येष्ठतेनुसार मला आशीर्वाद देण्याचा अधिकार आहे. त्यांना मी गोदी कामगारांच्या वतीने व युनियनच्या वतीने सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देतो.

या प्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज,  कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल,  प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव,  ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी केरसी पारेख, युनियनच्या खजिनदार व मुंबई पोर्ट  प्राधिकरणाच्या बोर्ड मेंबर कल्पना देसाई, मेरीटाईम युनियनचे अध्यक्ष कॅप्टन तुषार प्रधान, हिंद मजदूर सभेचे खजिनदार  जे. आर. भोसले,  मुंबई टांकसाळ मजदूर सभेचे कार्याध्यक्ष मुकुंद वाजे, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनगुटकर, दत्ता खेसे यांची भाची वंदना सांडभोर, नातू स्वराज खेसे इत्यादी मान्यवरांची शुभेच्छापर भाषणे झाली. सत्काराला उत्तर सत्करमूर्ती दत्ता खेसे व छाया खेसे यांनी दिले. सेवानिवृत्तीच्या या सन्मान सोहळ्याला गोदी प्रबंधक आर . एन.शेख,  गौतम डे, इस्टेट मॅनेजर शिरसाट, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन,  ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन, वेस्टन रेल्वे एम्प्लॉईज युनियन, न्हावा शेवा पोर्ट अँड जनरल वर्कर्स  युनियन, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समिती, मुंबई पोर्ट ट्रस्ट एस. सी. एस. टी. वेल्फेअर असोसिएशन,  मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियन, शोअर फ्लोटीला वर्कर्स असोसिएशन, नॅशनल सिफेरर्स युनियन ऑफ इंडिया,  मेरीटाईम युनियन ऑफ इंडिया, सौराष्ट्र कर्मचारी संघ, मुंबई पोर्ट ट्रस्ट पेन्शनर्स असोसिएशन व इतर कामगार संघटनांचे पदाधिकारी  आणि कामगार कार्यकर्ते,  मुंबई पोर्ट  प्राधिकरणाचे  अधिकारी, नातेवाईक  व गोदी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे, निवेदक विजय सोमा सावंत यांनी केले तर आभार युनियनचे सेक्रेटरी विजय रणदिवे यांनी मांनले. याप्रसंगी दत्ता खेसे यांच्या जीवन  प्रवासावर आधारित संतोष कोयंडे दिग्दर्शित माहितीपट दाखविण्यात आला


या सेवानिवृत्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यासाठी युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांनी विशेष परिश्रम घेतले. 

आपला 

मारुती विश्वासराव

प्रसिद्धीप्रमुख 

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

टिप्पण्या