दिनांक 5 जून 2024 रोजी जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महाविद्यालयात साजरा करण्यात येत आहे. आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी सायन्स महाविद्यालयात असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सागरी प्रदूषण, जास्त लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग, शाश्वत उपभोग आणि वन्यजीव गुन्हेगारी यांसारख्या पर्यावरणीय समस्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी हा जागतिक पर्यावरण दिन महत्त्वाचा आहे. जागतिक पर्यावरण दिन हा सार्वजनिक ठिकाणी पोहोचण्यासाठी हा एक जागतिक व्यासपीठ आहे. ज्यामध्ये दरवर्षी 143 हून अधिक देशांचा सहभाग असतो. ख्यातनाम व्यक्तींना पर्यावरणीय कारणांचे समर्थन करण्यासाठी कार्यक्रम आयोजन केला आहे. यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे रजिस्ट्रार माननीय सी एस ढवळे हे उपस्थित राहुन पर्यावरण रक्षण मध्ये वृक्ष लागवड व त्याचे महत्त्व त्यांनी आपल्या भाषणात पटवून दिले. अध्यक्षीय भाषण करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ डी यु गवई यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी यादिवशी वेगवेगळे पर्यावरण विषयक जागरूकता आणि कृती कार्यक्रम आयोजित करून जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने आपण एकत्र जमलो आहोत. हा दिवस पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा व आपल्या जबाबदारीचे आपल्याला जाणीव आणि दृष्टिकोन देतो. यामुळे महाविद्यालयात पूर्ण हरित परिसर असून डाळिंबाचे, पंधराहून अधिक नारळाचे आणि विविध प्रकारचे असे वृक्ष या ठिकाणी दिसून येतात आणि आज आपण वृक्ष लागवड करीत आहोत. दर वर्षीच्या प्रमाणे यावर्षी 5 जून 2024 रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येत आहे या दिवशी पुढील जीवनातील परिस्तिथी किती बिकट होईल ते पाहता त्यासाठी जागतिक पर्यावरण दिवस उपक्रमांतर्गत भाषणे करून, झाडे लावा उपक्रम राबवून पुढील धोका टाळण्याचे आज आपण आपल्या महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवे योजनेअंतर्गत कार्यक्रम आयोजन करून पर्यावरण रक्षणाचे कार्य करून जागरूकता निर्माण करित आहोत असे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना करतांना उपप्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रो डॉ सौ अरुणा राजेंद्र शुक्ला यांनी विचार मांडून या दिवसाचे महत्त्व स्पष्ट केले.शालेय समितीचे अध्यक्ष मा. नागापूरकर, महेश शुक्ला, माजी प्राचार्य डॉ नलवाड, कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो डॉ एल पी शिंदे, प्रा ई एम खिल्लारे, डॉ बालाजी कोम्पलवार, डॉ ए एन कुलकर्णी, प्रा रायनी राजेश्वरराव, प्रा अंबरखाने, प्रा ठोसरे, प्रा धीरबसी, प्रा श्रीकांत दुलेवाड, प्रा कार्तिक जाधव, सौ अर्चना कुलकर्णी, वैष्णवी राजुरकर, सोनाली वाणी, दिलीप कापुरे, शंकर पतंगे, राहुल, बबीता बाई, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक अभिजीत जाधव, दिनेश चव्हाण त्या सर्वांची या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून कार्यक्रम आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
नांदेड च्या सायन्स कॉलेजमध्ये जागतिक पर्यावरण दिवस मोठ्या उत्साहात संपन्न*
addComments
टिप्पणी पोस्ट करा