नवी मुंबई सानपाडा येथे महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण दिन साजरा*

नवी मुंबई सानपाडा येथे कै.  सिताराम मास्तर उद्यानात नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने  ५ जून हा  पर्यावरण दिन साजरा करण्यात आला 

नवी मुंबई महानगरपालिकेचे डी वॉर्डचे विभाग अधिकारी(उपायुक्त) भरत धांडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून  ५ जुन हा पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.    याप्रसंगी वसुंधरेची शपथ घेण्यात आली. ५ जुन हा  पर्यावरण दिनानिमित्त झालेल्या वृक्षारोपण प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे व हरियाली संस्थेचे अध्यक्ष मारुती नाना कदम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की,  पर्यावरण दिनाचे महत्त्व फार मोठे आहे. आज भारतात  ५३ टक्के तापमान वाढीचे प्रमाण पोहोचले आहे. ही बॉर्डर लाईन असून धोक्याची घंटा आहे.   तापमान ५६ टक्के  गेल्यावर मनुष्य हानी होऊ शकते. कोरोनानंतर आपण काही शिकलो नाही.  त्या दृष्टिकोनातून वृक्षारोपण करणे फार गरजेचे आहे. विदर्भ व मराठवाड्यात वृक्षारोपण न  झाल्यामुळे तापमानवाढीने अनेक लोक मृत्युमुखी पडले आहे. राजस्थानमध्ये  बीएसएफचे जवानानी २५  सेकंदात पापड भाजून  काढले. हा व्हिडीओ आज जगभर व्हाट्सअप वर फिरत आहे.  आफ्रिकेची राजधानी केपटाऊन ही  २०१३  पासून वॉटरलेस झाली असून मिलेटरी व पोलीस संरक्षणामध्ये प्रत्येकाला २५  लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. याचा अर्थ तपमानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. आज भारताला ५००  कोटी झाडे लावण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी पाच झाडे जरी  लावली तरी पर्यावरणाचे संरक्षण होईल व भारतातील नागरिकांना चांगल्या प्रकारे ऑक्सिजन मिळेल. 

आज झालेल्या पर्यावरण दिन प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे नवी मुंबईचे उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्याराव, सावंत,  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख अजय पवार, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक व मराठा विकास प्रतिष्ठानचे सहसचिव मारुती विश्वासराव,  सामाजिक कार्यकर्ते रणवीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. अजय पवार यांनी सर्वांचे आभार मानले.

आपला 

 मारुती विश्वासराव

टिप्पण्या