सायन्स कॉलेजमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न*

वार्ताहर दिनांक 31 मे 2024 रोजी सायन्स महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनी शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्वांनी पुष्प वाहून त्यांची जयंती साजरी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ डी यु गवई हे उपस्थित होते. अहिल्यादेवी होळकर यांच्या बद्दल बोलतांना लोकमाता अहिल्याबाई होळकर ह्या सर्व धर्म समभाव ,अस्पृश्यता उच्चाटन ,सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, गोरगरिबांच्या विषयी कळवळा, हुंडाविरोधी पद्धतीचे उच्चाटन, अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा बिमोड, मूल दत्तक वारसा हक्क ,प्रजेविषयी तळमळ अशा कितीतरी समाजसुधारकांचे कृतिशील कार्य करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा खेड्यात धनगर समाजातील माणकोजी व सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला.अहिल्याबाई होळकर बद्दल बोलतांना उपप्राचार्य व स्टॉप सेक्रेटरी तसेच रा से यो कार्यक्रमाधिकारी प्रो डॉ सौ अरुणा राजेंद्र शुक्ला यांनी असे स्पष्ट केले की

अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, एवढेचं नाही तर त्यांनी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखले प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या.अहिल्याबाई होळकरांनी अठ्ठावीस वर्षे राज्य केले, आणि उत्तरेत मराठ्यांची प्रतिष्ठा वाढवली. तिने तिच्या राज्यात शांतता आणि सुव्यवस्था आणली आणि तिचा लोकांना आनंद दिला. आज आपण त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यासाठी एकत्र जमलो आहोत आणि त्यांचे स्मरण करीत आहोत. कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो डॉ एल पी शिंदे, प्रो डॉ डी आर मुंडे, डॉ सौ व्ही व्ही कुलकर्णी, प्रा डॉ पी आर कुलकर्णी, प्रा एस आर दूलेवाड, प्रा व्ही एन नरवाडे, प्रा आर व्ही गावित, प्रा एस पी चव्हाण,  सौ अर्चना कुलकर्णी, दिलीप कापुरे, शंकर पतंगे कार्यक्रमात उपस्थित राहून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस जयंती निमित्त पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ एन जे देशमुख यांनी केले


टिप्पण्या