नांदेड / प्रतिनिधी-नांदेड उत्तर
विधानसभा मतदार संघातून काँग्रेस
पक्षातर्फे जिल्हा कार्याध्यक्ष राजेश
पावडे हे इच्छुक असून त्यांनी
निवडणूक लढविण्याची तयारी सुरु
केली आहे.
नांदेड उत्तर विधानसभा
मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला
म्हणून ओळखल्या जातो. या
मतदारसंघातून दोन वेळा माजी मंत्री
डी.पी. सावंत हे विजयी झाले होते.
या मतदारसंघात काँग्रेसला मानणारा
मोठा वर्ग आहे. या मतदारसंघावर
काँग्रेसचा ज्येष्ठा फडकविण्यासाठी
काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष
राजेश पावडे यांनी आगामीविधानसभा निवडणुकीची तयारी सुरु
केली आहे. मतदारसंघात त्यांचा मोठा
जनसंपर्क असून कार्यकर्त्यांची टीम
त्यांच्या मागे उभी आहे. राजेश पावडे
हे कॉंग्रेसचे एकनिष्ठ पदाधिकारी म्हणून
ओळखले जातात. मराठवाडा सहकारी
साखर कारखान्याचे संचालक तसेच
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे
संचालक म्हणून त्यांनी काम केले
आहे. त्यांच्या पत्नी ह्या नांदेड जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका
आहेत. सहकार व सामाजिक क्षेत्रात
त्यांचे काम उल्लेखनिय आहे. विविध
सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी ते
नेहमीच अग्रेसर असतात. माजी
मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी
काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून लोकसभा
निवडणुकीच्या पूर्वी भाजपात प्रवेश
केला होता. परंतु राजेश पावडे यांनी
काँग्रेस पक्षावरच आपली निष्ठा कायम
ठेवली आहे. लोकसभा निवडणुकीत
काँग्रेस व महाविकास आघाडीचे
उमेदवार वसंत चव्हाण यांच्या प्रचारात
राजेश पावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी
सक्रीय राहून काँग्रेसच्या विजयामध्ये
योगदान दिले. काँग्रेसच्या विजयामुळे
पदाधिकारी व कार्यकत्यांमध्ये उत्साह
निर्माण झाला आहे. आगामी
विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर
मतदारसंघातून राजेश पावडे यांनी
जोरदार मोर्चे बांधणी सुरु केली असून
सर्वसमाजासोबत त्यांचे सलोख्याचे
संबंध आहेत. काँग्रेस पक्षाने उत्तर
विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी
दिली तर आपण निश्चित विजयी
होवू असा दावा राजेश पावडे यांनी
केला. सर्वसामान्य नागरिकांचे
आशिर्वाद आपल्या पाठीमागे
खंबीरपणे असल्याचे त्यांनी सांगितले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा