माजी राज्यमंत्री मा.श्री.डी.पी.सावंत यांच्या हस्ते प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचा सत्कार*

 नांदेड:(दि.१७ जून २०२४)

          महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री, नांदेडचे माजी पालकमंत्री व श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा.श्री.डी.पी.सावंत यांच्या हस्ते जलतरण स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागातील प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचा यथोचित सत्कार संपन्न झाला.

           कै.शांताराम सगणे महानगरपालिका जलतरणीका, नांदेड येथे एन्जॉय स्विमिंग ग्रुपतर्फे दि.१६ जून रोजी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत पन्नास मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत प्रा.ओमप्रकाश नागनाथराव गुंजकर यांना प्रथम पुरस्कार व जलतरण स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा सत्कार संपन्न झाला.

           या सुयशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ. हरिश्चंद्र पतंगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. कबीर रबडे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही. पदमारानी राव, डॉ. एम.एम.व्ही.बेग, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ.श्रीरंग बोडके, डॉ.अजय गव्हाणे, प्रा. श्रीकांत सोमठाणकर, डॉ.वीरभद्र स्वामी, डॉ. रामराज गावंडे, प्रा.नरेंद्र कंचटवार, डॉ. एकनाथ मिरकुटे, प्रा.सचिन अपस्तंभ, प्रा.अभिनंदन इंगोले, प्रा.मुकेश धर्मले, डॉ.मीरा फड, डॉ.संगीता मसारे, डॉ. मनीषा तांदळे, डॉ.भास्कर देशमुख, सेवानिवृत्त वन अधिकारी गोपाळराव गुंजकर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक किशोर गुंजकर, श्रीकांत गुंजकर, बालाजी गाडे, जगदीश उमरीकर आदींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या