नांदेड.
शहरातील रयत रुग्णालयाच्या आरोग्य मंडळाच्या उपाध्यक्षपदी एम आर जाधव यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे अभिनंदन करून वर्कर्स फेडरेशनच्या वतीने झोन सचिव संजय टाक, कामगार नेते विजय रणखांब मंडळ अध्यक्ष मोईन भाई शेख, झोन सहसचिव सुरेश गुंडमवार, मंडळ सचिव बालाजी सकरगे, झोन तांत्रिक सदस्य भीमराव खानसुळे अभिनंदन करून जाधव यांचा सत्कार दि.24 मे रोजी करण्यात आला.
वर्कर्स
फेडरेशनचे कामगार नेते तथा सामाजिक कार्यकर्ते एम आर जाधव यांनी कामगार संघटनेत विविध पदावर कार्य केलेले असून त्यांचे सामाजिक कार्य अजूनही सुरूच असून जाधव यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहेत. रयत रुग्णालयाच्या स्थापनेपासून मागील वीस वर्षापासून ते रयत कार्यकारिणीवर पदाधिकारी आहेत व त्यांचा सहभाग या कार्यात आहे मागील दहा वर्षापासून ते उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहे नांदेड शहरातील रयत रुग्णालयाची स्थापनेमध्ये डॉक्टर खुरसाळे व त्यांचे सहकारी यांचे फार मोठे योगदान आहे. डॉ.खुरसाळे व जाधव यांचे नेतृत्वात गोदावरी नदीच्या घाटावर अंत्यविधीसाठी पूर्वी सोय नव्हती तेव्हा डॉ..खुरसाळे एम आर जाधव डॉ. साजणे ,विजय मालपाणी ,हर्षद शहा, प्रसाद सहानी, डॉक्टर शर्मा व त्यांची इतर सहकाऱ्यांनी गोदावरी घाटावर सर्वधर्म शांतीधाम सेवा प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे या कामी त्याकाळी महानगरपालिकेने सुद्धा बजेटची सोय करून बांधकाम करून दिलेले आहे. सामान्य माणसाला अल्पदरात आरोग्य सेवेचा उपचार मिळाला पाहिजे म्हणून डॉक्टर खुरसाळे यांचे अध्यक्षतेखाली रयत आरोग्य मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे.आणी ती सेवा आजही सुरू आहे.तसेच नेरली येथे कुष्ठधाम येथील रुग्णांची देखभालीसाठी मध्ये सुद्धा एम आर जाधव यांचा सहभाग आहे.
मनोहर जाधव म्हणजे हे एक संघर्ष योद्धे असून ते एक चालतं बोलत विद्यापीठ आहेत ,सामान्य माणसाला आणि कामगारांना त्यांचे न्याय व हक्क मिळाले पाहिजे हे त्यांच्या विचारसरणीत असल्याने ते कधीही थकत नाहीत त्यांचे कार्य अजूनही जोमाने सुरूच आहे अशा कार्यशील कर्तुत्वाला आम्ही सलाम करतो आणि आणि कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सत्कार केलाच पाहिजे ही आमची जबाबदारी असुन आपण त्यांचा आदर्श घेतला पाहिजेत असे मत वर्कर्स फेडरेशनचे कामगार नेते विजय रणखांब यांनी व्यक्त केले आहेत. कामगारांसाठी साठी सतत लढणारे नेते म्हणून ते सक्रिय आहेत असे मत मंडळ अध्यक्ष मोईन भाई शेख यांनी व्यक्त केले. वर्कस फेडरेशनच्या कार्यात जाधव यांचा फार मोठा वाटा असून नांदेडमध्ये संघटनेचे कार्यालयाचे बांधकाम करून वास्तू उभी केली असल्याची माहिती झोन सहसचिव सुरेश गुंडमवार यांनी दिली. सेवानिवृत्ता साठी पेशंनची सोय नाही म्हणून कामगाराप्रति ते आताही शासनाची लढत आहेत, सेवानिवृत्त व सर्व कामगारांना पेन्शन मिळाली पाहिजे हा त्यांचा प्रमुख लढा असल्याचे मत झोन सचिव संजय टाक यांनी व्यक्त केले आहे.या सत्कार सोहळयाचे आभार मंडळ सचिव बालाजी सकरगे यांनी मानले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा