ओशो एक दिवसीय ध्यान शिबिर उत्साहात संपन्न*

 नांदेड :(दि.१२ मे २०२४)

           विवेक नगर, प्रा.सुनील नेरळकर  यांचे निवासस्थान येथील ओशो मीरा ध्यान केंद्रात दि.१२ मे २०२४, रविवार रोजी एक दिवसीय ओशो ध्यान शिबिर उत्साहात संपन्न झाले.

           या शिबिरात ओशो ब्लेसिंग इंटरनॅशनल मेडिटेशन कम्यूनचे संचालक स्वामी गोपाल भारती, स्वामी प्रेम प्रशांत आणि मा प्रेम सुगंधा यांच्या मार्गदर्शनानुसार किर्तन ध्यान, चंक्रमण ध्यान, ओंकार ध्यान, नृत्य ध्यान, लिसनिंग मेडिटेशन, प्रवचन ध्यान आदी ध्यान प्रकाराचे उत्कृष्ट साऊंड सिस्टीम असलेल्या वातानुकूलित ध्यान केंद्रात नि:शुल्क आयोजन करण्यात आले होते.

           याप्रसंगी प्रा.सुनील नेरळकर, सौ. शरयू नेरळकर, सुभाष फाळके, प्रा. महेंद्र देशमुख, उमरी, अनुराग पारवेकर, शामसुंदर मोतेवार, शंकर बगाटे, सौ. सारिका बगाटे आणि यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे आदींनी सर्व ध्यान प्रकारात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

टिप्पण्या