_ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या १२८ वर्षांच्या नुसी संघटनेचा स्थापना दिवस संपन्न_*

ब्रिटिशांच्या काळात ९ मे १८९६ रोजी  मोहम्मद इब्राहिम सारंग यांनी जहाजावरील नाविक  कामगारांना संघटित करून त्यांच्या न्याय हक्कासाठी नॅशनल सिफेरर्स ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना केली. गेली १२८  वर्ष या कामगार संघटनेची  यशस्वी वाटचाल सुरू आहे. या वाटचालीत मोहम्मद इब्राहिम सारंग,  लिओ बार्न्स, अब्दुल गनी सारंग यासारख्या लोकप्रिय कामगार नेत्यांनी  या संघटनेचे दीर्घकाळ नेतृत्व केले.  या संघटनेचा दरवर्षीप्रमाणे ९ मे  हा " फाउंडेशन डे"  मस्जिद बंदर  येथील  सिमेन्स हॉस्टेल या ठिकाणी  नुसी संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रेमानंद साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.  

प्रेमानंद साळगावकर यांनी आपल्या अध्यक्षिय  भाषणात  सांगितले की,  मोहंम्मद  अब्राहमं सारंग यांनी ही संघटना ब्रिटिश काळात स्थापन केली असून, १९२६ साली कामगार संघटना कायद्याखाली ती नोंद झाली. मोहम्मद इब्राहिम सारंग यांनी नाविक कामगारांची एकजूट करून त्यांना पगारवाढ व अनेक कामगार कल्याणकारी योजना मिळवून दिल्या. मोहम्मद अब्राहम सारंग हे  १९२८  ते १९४८ च्या दरम्यान   मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक होते,  तसेच ते स्थायी समितीचे पदाधिकारी होते.   नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत  पुन्हा बहुमताने फेरनिवड झालेले नुसीचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की,  भारतीय व परदेशीय जहाजावरील नाविक कामगारांचा कोणताही संप न करता व मनुष्यबळ वाया न घालविता पगारवाढीचे  चांगले करार करून कामगारांना सर्वांच्या सहकार्याने  पगारवाढ मिळवून दिली आहे. नाविक कामगार व त्यांच्या कुटुंबासाठी संघटनेमार्फत अनेक कामगार कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्याचा कामगारांनी व  त्यांच्या कुटुंबियांनी फायदा घ्यावा. 

याप्रसंगी डायरेक्टोरेट जनरल शिपिंगचे डेप्युटी डायरेक्टर कॅप्टन डॅनियल जोसेफ, इंडियन नॅशनल शिप ओनर्स असोसिएशनचे (INSA ) मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल देवळी,  MASSA चे डायरेक्टर विनीत गुप्ता, फॉरेन शिप ओनर्स असोसिएशनचे डायरेक्टर कॅप्टन राजेश टंडन,  मेरीटाईम युनियन ऑफ इंडियाचे ( MUI )  जनरल सेक्रेटरी कॅप्टन तुषार प्रधान इत्यादी मान्यवरानी मार्गदर्शनपर भाषणे केली. सभेचे सूत्रसंचालन युनियनचे असिस्टंट जनरल सेक्रेटरी सुनील नायर यांनी सुंदर केले. याप्रसंगी व्यासपीठावर नुसीचे पदाधिकारी लुईस गोम्स, सुरेश सोलंकी आदी मान्यवर उपस्थित होते. सभेला नाविक कामगार व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या