महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे प्रचंड मताने विजयी होतील*

 *सानपाडा येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांना विश्वास* 

महाविकास आघाडीचे ठाणे  लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार  मा. श्री. राजन विचारे यांच्या प्रचारार्थ सानपाडा विभागातील शिवसेना ( ऊबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस,  काँग्रेस, आप  व इतर पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा  मेळावा  १९ एप्रिल २०२४  रोजी सानपाडा येथील मराठा देशस्थ भवन येथे संपन्न झाला. 

  ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मा. श्री.  राजन विचारे यांनी आपल्या खासदार निधीतून श्री. दत्त मंदिर पादचारी पुलास लिफ्ट, सानपाडा सेक्टर ५ मध्ये गावदेवी मैदानात व्यायामशाळा,  सानपाडा रेल्वे स्टेशन समोर  महामार्गालगत एसटी आरक्षण व  प्रतीक्षालय कक्ष,  झाशीची राणी लक्ष्मीबाई मैदानाचे सुशोभीकरण,  सानपाडा गावातील २२५  ग्रामस्थांच्या घरांना ब्रिटिश काळानंतर सनद व प्रॉपर्टी कार्ड वाटप, सीवूड ते उरण रेल्वे प्रकल्प  इत्यादी सर्व सामाजिक कार्यामुळे राजन विचारे यांची ठाणे लोकसभा मतदारसंघात चांगलीच लोकप्रियता वाढली  आहे. त्यांचे  ८० टक्के समाजकारण व २०  टक्के राजकारण या कार्यशैलीमुळे ते गेल्या वेळेस ४  लाखाहून अधिक  मताधिक्याने निवडून आले होते.  परंतु यावेळेस ते निश्चितच ८ लाख मताधिक्याने  निवडून येतील, असा कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे. 

 या मेळाव्याप्रसंगी शिवसेना (उबाठा) ठाणे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, सोमनाथ वास्कर, महेश बनकर,  राष्ट्रवादी काँग्रेसचे रुपेश ठाकूर,  संगीता बोराडे, काँग्रेसचे  नासिर हुसेन,  सिंदिया घोडके, संजय कपूर, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव आदी मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालन विभाग प्रमुख अजय पवार यांनी केले. या मेळाव्यास शिवसेना (उबाठा) माजी नगरसेविका कोमल वास्कर , उपशहरप्रमुख सुनील गव्हाणे,  शाखाप्रमुख बाबाजी इंदोरे,  दत्तात्रय कुरळे, साधना इंदोरे, चांदभाई शेख, संदेश चव्हाण, तानाजी पाटील, रवी शिंदे तसेच  राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आप व महा विकास आघाडीतील  इतर पक्षांचे पदाधिकारी,  कार्यकर्ते व सानपाडा विभागातील रहिवाशी जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपला

मारुती विश्वासराव

टिप्पण्या