*निवडणूक साहित्याची मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयातून उचल*

 *साहित्य वितरण कक्षाची अविरत सेवा* 

नांदेड दि. १९ : मुंबई, पुणे, संभाजीनगर आदी ठिकाणावरून शासकीय मुद्रणालयातून येणारे विविध प्रकारचे साहित्य वितरणाचे महत्त्वपूर्ण काम साहित्य वितरण कक्षातून सुरू आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी जवळपास हे वितरण पूर्ण झाले आहे

      लोकसभा निवडणुकीमध्ये आवश्यक साहित्य वितरण वेळेत व्हावे, याला अधिक महत्त्व दिले जाते. यासाठी आचारसंहिता लागल्यापासून साहित्य वितरण कक्ष स्थापन केला जातो. नांदेड साठी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रूपाली चौगुले यांच्या मार्गदर्शनात नियोजन भावनांमध्ये या साहित्य कक्षाची उभारणी करण्यात आली आहे

       निवडणुकांमध्ये अधिक सुबक, प्रगत असे साहित्य सध्या वापरण्यात येत आहे. ईव्हीएमचे बॅलेट युनिट कव्हर करणारे कंपार्टमेंट, पोस्टर, सूचना पत्र,ओळखपत्रे,लेखन सामग्री, स्टेशनरी, विविध नमुने, लिफाफे, कागदी सील, वोटर स्लिप, बॅलेट पेपर आदी साहित्य या कक्षामार्फत दिले जाते. जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासह त्यांची मोठी टीम या कार्यामध्ये सहभागी झाली आहे.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज