विभाग प्रमुखांच्‍या गाड्यावर आता मतदान जनजागृती ‘सीईओ’च्‍या हस्‍ते वाहनांवर लागले स्टिकर उमेदच्या वतीने सेल्फी पॉईंट

नांदेड दि. 19 :  मतदानाविषयी जनजागृती करण्‍यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उप‍क्रम राबविण्‍यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता मतदान करण्‍याबाबत आवाहन असलेले स्टिकर्स विविध विभाग प्रमुखांच्‍या वाहनांवर लावण्यात आले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, ग्राम पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, महिला बाल विकास विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम- कदम, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर आदींची उपस्थिती होती.

यावेळी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने मतदान जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेले टी शर्ट, टोपी व सेल्फी पॉइंटचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मतदानाविषयी शपथ घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे विविध खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह बालाजी नागमवाड, शुभम तेलेवार, नंदलाल लोकडे, स्वीपचे प्रलोभ कुलकर्णी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. विलास ढवळे, तंत्रस्नेही शिक्षक सुनील आलूरकर, आर.जी. कुलकर्णी, रवी ढगे, सारिका आचने, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पातेवार, अधीक्षक द्वारकादास राठोड, जिल्हा व्यवस्थापक गणेश कवडेवार, माधव भिसे, रमेश थोरात, जिल्हा कौशल्य समन्वयक अतिश गायकवाड, बालाप्रसाद जंगिलवाड, लेखापाल हणमंत कंदुरके आदींची उपस्थिती होत

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
नांदेड : अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉ. लता गायकवाड यांची राज्य कमिटीच्या सचिव मंडळ सदस्यपदी नुकतीच निवड झाली आहे.
इमेज
माहूर शहरात क्रांतिसूर्य बिरसामुंडा यांची जयंती विवीध ठिकाणी साजरी.
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज