माहुर शहरात सुर्यवंशी पाटलांचा फ्लॉप रोड शो?

राम दातिर माहूर (प्रतिनिधी)हिंगोली लोकसभा मतदरसंघाची निवडणुक २६ एप्रिल रोजी पार पडणार आहे.त्यामुळे महायुती,महाविकास आघाडी,वंचित बहुजन आघाडीसह अपक्षांच्या प्रचाराला आता जोर चढला आहे. दि.२० एप्रिल रोजी स.११ वा. किनवट/माहुर विधानसभा प्रमुख अशोक पाटील सुर्यवंशी यांचे नेतृत्वात निघालेल्या मोटार सायकल रॅलीकडे युवा मोर्चाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली.हा रोड शो फ्लॉप झाल्याने महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक चांगलीच वाढली आहे.


      माहूर शहरातील दत्त चौक ( टी पॉइंट)येथून निघालेल्या मोटार सायकल रॅलीत २० मोटार सायकल व चालका व्यतिरिक्त कुणीही नसलेल्या १५ चारचाकी वाहनांच्या समावेश होता. या रॅलीत सुर्यवंशी पटलांसह महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष छाया राठोड,सुमित राठोड,सागर राठोड,संतोष अडकिने, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक, शहरप्रमुख विकास कपाटे,विनोद सुर्यवंशी पाटील आदींचा समावेश होता.महामार्गावरून निघालेल्या रॅलीतील अस्तव्यस्त वाहनांमुळे परिवहन महामंडळाच्या तीन बसेस दहा ते पंधरा मिनिट एकाच ठिकाणी खोळंबून पडल्याने प्रवाशांची मोठी कुचंबणा झाली.निघालेल्या रॅलीत आपल्या उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन केल्याचे कुठेही आढळून आले नाही.रॅलीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाली.त्यानंतर  नगर पंचायत प्रांगणात मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सभा पार पडली.यावेळी मार्गदर्शन करतांना सुर्यवंशी पाटील म्हणाले की,तुमच्या नशिबाने मी आज आमदार नाही,असतो तर साखर कारखाना उभा करण्यासह इतर सर्वच कामे केली, असती अशी दर्पोक्ती केली.

टिप्पण्या
Popular posts
पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेडचे दहावीच्या निकालात घवघवीत यश
इमेज
मिल्लत नगरच्या नागरी सुविधासाठी लोकविकासचे शिष्टमंडळ मनपा आयुक्तांना भेटणार (तातडीने कारवाई केली नाहीतर माकप आंदोलनाच्या पवित्र्यात)
इमेज
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या विविध उपसमित्या जाहिर अभिमन्यू पवार, लातूर – उपाध्यक्ष, सौ. अश्विनी पाटील, पुणे, व सौ ग्रीष्मा पाटील, पालघर – उपाध्यक्ष पदी
इमेज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज
कामगार संघटनेच्या कार्यात कामगार कार्यकर्ते महत्त्वाचे- एस. के. शेट्ये*
इमेज