निवडणूक कर्मचा-यांसाठी 108 बसेसची व्‍यवस्‍था प्रशासनाचा परिवहन मंडळाशी करार

नांदेड दि. 19 :  नांदेड व हिंगोली लोकसभेसाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी कर्मचा-यांना नऊ विधानसभा मतदार संघात 24 एप्रिल 2024 रोजी नेऊन सोडणे व 26 एप्रिल 2024 रोजी निवडणूक मतदान प्रक्रीया पार पाडल्‍यानंतर परत त्‍यांना त्‍यांच्‍या विधानसभा मतदार संघात घेवून येण्‍यासाठी 108 बसेसची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी त्‍या-त्‍या मतदार संघातील नेमून दिलेल्‍या केंद्रावर 24 एप्रिल 2024 रोजी सकाळी 6 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.

निवडणुकीच्‍या कामाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्‍या वाहतुकीसाठी  44  सिटर बसेस आहेत. दि. 24 एप्रिल 2024 रोजी सकाळी 6 वाजता संबंधित विधानसभा मतदारसंघात बस उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहेत. 83 किनवट विधानसभा मतदार संघासाठी 14, 84-हदगाव मतदार संघासाठी 11 , 85-भोकर मतदार संघासाठी 12, 86- नांदेड उत्‍तर व 87- नांदेड दक्षिण मतदार संघासाठी 19,  88-लोहा मतदारसंघासाठी 14, 89-नायगाव मतदार संघासाठी  12,  90 देगलूर मतदार संघासाठी 13 बसेस तर 91- मुखेड मतदार संघासाठी 13 अशा एकूण 108 बसेसची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. याबाबत जिल्‍हा प्रशासनाने परिवहन विभागाशी करार केला आहे.


मतदान अधिकारी कर्मचा-यांना जाण्‍या - येण्‍यासाठी पुढीलप्रमाणे ठिकाणे नेमून दिलेली आहेत. निवडणूक साहित्‍य घेवून या कर्मचा-यांना ए‍क दिवस आधीच मतदान केंद्रावर पोहोचणे सोपे व्‍हावे यासाठी ही व्‍यवस्‍था आहे. निवडणूक चमुना पुढील केंद्रावरुन बसेसची व्‍यवस्‍था त्‍या-त्‍या ठिकाणी करण्‍यात आली आहे. 83- किनवट मतदार संघासाठी साठी शासकीय आयटीआय गोंकुदा, किनवट येथे तर 84- हदगाव साठी समाज कल्‍याण विभागाचे मागासवर्गीय शासकीय मुलीचे वसतिगृह, बुध्‍दभुमी  वसाहत, तामसा रोड, हदगाव,  85- भोकर मतदार संघासाठी मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह भोकर, 86- नांदेड उत्‍तर व 87- नांदेड दक्षिण साठी शासकीय तंत्र निकेतन नांदेड, 88-लोहा मतदार संघासाठी पंचायत समिती, तहसिल कार्यालय परिसर लोहा,  89 – नायगाव  मतदार संघासाठी शासकीय आयटीआय  नायगाव, 90- देगलूर मतदार संघासाठी तहसिल कार्यालय देगलूर, 91-मुखेड मतदार संघासाठी मध्‍यवर्ती प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालय, मुखेड येथे राहणार आहे. यामुळे निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी याची नोंद घ्‍यावी, असे निवडणूक विभागाने कळविले आहे.


००००

टिप्पण्या
Popular posts
पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेडचे दहावीच्या निकालात घवघवीत यश
इमेज
मिल्लत नगरच्या नागरी सुविधासाठी लोकविकासचे शिष्टमंडळ मनपा आयुक्तांना भेटणार (तातडीने कारवाई केली नाहीतर माकप आंदोलनाच्या पवित्र्यात)
इमेज
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या विविध उपसमित्या जाहिर अभिमन्यू पवार, लातूर – उपाध्यक्ष, सौ. अश्विनी पाटील, पुणे, व सौ ग्रीष्मा पाटील, पालघर – उपाध्यक्ष पदी
इमेज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज
कामगार संघटनेच्या कार्यात कामगार कार्यकर्ते महत्त्वाचे- एस. के. शेट्ये*
इमेज