◾ चेहराच नसणाऱ्या इडी आघाडीकडे इतका मोठा देश देणार का ? मोदींचा सवाल


चार जूनच्या निकालानंतर इंडिया आघाडीतील नेते एकमेकांचे कपडे फाडतील नरेंद्र मोदी 

◾मला मजबुती देण्यासाठी खासदार चिखलीकरणा विजयी करा पंतप्रधान नरेंद्र मोदी


 नांदेड प्रतिनिधी 


 मला मजबुती देण्यासाठी प्रताप पाटील चिखलीकर यांना भरघोस मतदान करा असे आवाहन नांदेड येथील विराट सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं यावेळी त्यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांची आठवण सांगत अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबद्दल आनंद व्यक्त केला शहराच्या जुना कोठा भागात मोदी मैदानावर भाजप महायुतीची उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दिनांक 20 एप्रिल रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले होते यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण खासदार अजित गोपछडे माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील आमदार राम पाटील रातोळीकर आमदार राजेश पवार आमदार भीमराव के राम भाजपचे दिलीप कंदकुर्थे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख डॉक्टर संतु खांबर्डे संजय घोडके आमदार तुषार राठोड माजी आमदार अमर राजूरकर चैतन्य बापू देशमुख प्रवीण साले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर उमेश मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप धर्माधिकारी रिपब्लिकन पक्षाचे विजय सोनवणे यांच्यासह नांदेड लोकसभेचे भाजप उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि हिंगोली चे शिवसेना उमेदवार बापूराव कदम कोहळीकर यांची उपस्थिती होती


 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले भाषण सकाळी सव्वा अकरा वाजता सुरू करताना छत्रपती शिवाजी महाराज संत सेवालाल महाराज हर हर महादेव आशा घोषणा देत सुरू केलं नांदेडकर आणि हिंगोली करांना माझा साष्टांग नमस्कार असेही ते म्हणाले 26 एप्रिल ची तयारी झाली ना   ? असा प्रश्न विचारला मराठवाड्यांच्या पवित्र भूमीमध्ये श्री गुरुगोविंद सिंग रेणुका माता दत्त भगवान यांना प्रणाम करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नानाजी देशमुख या दोन्ही भारतरत्नांना त्यांनी अभिवादन केलं पुढे बोलताना म्हणाले की काल झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानामुळे एनडीए पक्षाला एकतर्फी मतदान झाले त्यामुळे एनडीए सरकारचा विश्वास वाढला मतदान सर्वांनी करावे देशाचे भविष्य पक्के आणि मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान झालं पाहिजे देशाची सुरक्षा करण्यासाठी जसे सैनिक सीमेवर डोळ्यात तेल टाकून उभे राहतात तसेच मतदारांनी ही देश वाचवण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावावा मोठ्या प्रमाणात मतदान झालं पाहिजे यासाठी सर्व राजकीय पक्षांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजे भारतामध्ये मतदान टक्केवारी जर वाढली तर त्याचा प्रभाव जागतिक पातळीवर होतो त्यासाठी लोकशाहीची ताकद दाखवण्यासाठी मतदान करणे गरजेचे असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले,◾शंकरराव चव्हाण यांची आठवण आणि अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाचे स्वागत 

राजकीय क्षेत्रात अत्यंत यशस्वी कारकीर्द उपभोगत असतानाही मोठ मोठी पदे भूषवलेली भूषवलेले शंकरराव चव्हाण यांच्या तीन नम्रता आणि जिव्हाळा कायम स्मरणात असून असून प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. आम्ही देशाला विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत अशोक चव्हाण हेही सोबत आले आहेत ही आनंदाची बाब असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले मी राजकारणात नव्हतो तेव्हापासून चव्हाण कुटुंबीय राजकारणात आहे अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांच्याशी चर्चा करण्याचा योग सत्यसाईबाबा यांच्या पुठपूर्ती येथे आला होता तेव्हा मी राजकारणात नव्हतो त्यावेळी शंकरराव चव्हाण यांचा नम्रतेचा आणि जिव्हाळ्याचा स्वभाव मला आजही प्रेरित करतो असे मोदी म्हणाले त्यांच्या अंगी असलेली नम्रता पाहून मी आजही त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो अशी आठवण सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजपात येण्याचे येण्याने आनंद झाल्याचे सांगितले


मोदींनी विरोधकावर तीर सोडला लागला मात्र अशोक चव्हाणांना

 कार्यकर्तेही अवघडले

 शनिवारी नांदेड मध्ये नरेंद्र  मोदींनी विरोधकावर टीकेचे तीर सोडले मात्र हे तीर नुकतेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांना लागले त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते ही गप्पगार झाल्याचं पाहायला मिळाले कोठा येथील मैदानात पंतप्रधान मोदींची सभा झाली या सभेमध्ये मोदींनी केलेल्या विधानाची सर्वत्र चर्चा आहे जे लोक निवडून येऊ शकत नाहीत ते मागच्या  दाराने राज्यसभेत खासदार बनतात असे विधान मोदींनी अशोक चव्हाण यांच्याकडे कटाक्ष टाकून केले मोदींच्या या वक्तव्यामुळे चव्हाणासह समोर बसलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यानाही अवघडल्यासारखे झाले काही लोक निवडून येण्याची क्षमता नसल्याने मागच्या दरवाज्याने राज्यसभेवर खासदार म्हणून जात आहेत याला काय म्हणावे असे विधान मोदींनी केले या विधानानंतर नांदेडच्या सभेत प्रचंड शांतता निर्माण झाली. दरम्यान मोदी यांच्या बाजूलाच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना खुर्ची देण्यात आली होती गेल्या निवडणुकीमध्ये चव्हाण यांचा पराभव झाला होता त्यानंतर यंदा त्यांनी भाजपची कास धरली आणि त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले मात्र मोदीच्या विधानानंतर चव्हाणांचे तोंड पडले आणि समर्थकांमध्ये निरव शांतता पसरली 

आदर्श घोटाळ्याचा आरोप 

दरम्यान 2014 च्या लोकसभा निवडणुकी वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेड मधील सभेत अशोक चव्हाण यांच्यावर हल्ला चढवला होता आदर्श घोटाळ्यात अडकलेल्या चव्हाणावर कारवाईचे आश्वासन मोदींनी दिले होते त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ काँग्रेसने शेअर केला आहे हे विशेष


,◾ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की देशाचा पंतप्रधान हा स्वच्छ मनाचा आणि हिम्मतबाज आहे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आमच्या सरकारने दहा टक्के दिले आणि ते न्यायालयात टिकले येणाऱ्या काळात पूर्ण आरक्षण देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली आहे शीख समाजाचाही विश्वास आमच्या सरकारवर वाढलेला आहे मोदी यांच्यावर लोकांचा विश्वास आहे चंद्रयान सारखे यशस्वी प्रयोग करून मोदीनिदेश जागतिक पातळीवर नेला आहे त्यांनी आपले जीवन पूर्ण देशासाठी समर्पित केला आहे

कार्यक्रमाची प्रस्तावना प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले

टिप्पण्या
Popular posts
पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेडचे दहावीच्या निकालात घवघवीत यश
इमेज
मिल्लत नगरच्या नागरी सुविधासाठी लोकविकासचे शिष्टमंडळ मनपा आयुक्तांना भेटणार (तातडीने कारवाई केली नाहीतर माकप आंदोलनाच्या पवित्र्यात)
इमेज
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या विविध उपसमित्या जाहिर अभिमन्यू पवार, लातूर – उपाध्यक्ष, सौ. अश्विनी पाटील, पुणे, व सौ ग्रीष्मा पाटील, पालघर – उपाध्यक्ष पदी
इमेज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज
कामगार संघटनेच्या कार्यात कामगार कार्यकर्ते महत्त्वाचे- एस. के. शेट्ये*
इमेज