रामिम संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई यांना पूत्रशोक*

     मुंबई दि.१६: राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई यांचे द्वितीय पुत्र ऍड.संदीप देसाई यांचे काल नायर इस्पितळात अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले(४४).देसाई कुटुंबियावर कोसळलेल्या आकस्मिक दु:खद घटने बद्दल संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिन भाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी शोक व्यक्त केला आहे.संदीप देसाई त्यांच्या पश्चात आई,वडील,भाऊ,पत्नी आणि लहान दोन मुले असा कुटुंब परिवार आहे. दिवंगत संदीप देसाई यांच्यावर अंत्यसंस्कार कोल्हापूरात 'महागौंड' या  रहात्या गावी करण्यात आले.पुत्र संदीप देसाई यांच्या अकाली निधनाने शोकाकुल झालेल्या निवृत्ती देसाई यांचे कामगार भागातील विविध संस्था,संघटना कडून सांत्वन होत आहे. संघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी काल मुंबईत संदीप देसाई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.•••

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज