संविधानामुळेच बहुजन समाजाला आणि स्त्रीयांना सन्मानाने जगण्याची संधी* - *डॉ. महेश कळंबकर*


नांदेड:( दि.१५ एप्रिल २०२४)

          हजारो वर्षापासून दरिद्रता, अज्ञान, गरिबी आणि गुलामगिरीमध्ये यातनामय जीवन जगणाऱ्या तमाम बहुजन समाजाला आणि स्त्रियांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानामुळेच शिक्षणाची दारे उघडी झाली. शिक्षण घेतल्यामुळेच बहुजनांना व महिलांना नोकऱ्या मिळाल्या व सन्मानाने जगण्याची संधी मिळाली, असे प्रतिपादन यशवंत महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाप्रमुख डॉ.महेश कळंबकर यांनी केले.


         श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात प्राचार्य तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित यशवंत प्रबोधन व्याख्यानमालेत 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रासंगिकता' या विषयावर ते बोलत होते.

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान प्राचार्य  डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी विचारपिठावर उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चन्द्र पतंगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. कबीर रबडे, यशवंत प्रबोधन व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ.संदीप पाईकराव उपस्थिती होती.

          प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

           पुढे बोलताना डॉ.महेश कळंबकर म्हणाले की, आज खऱ्या अर्थाने विश्वाला युद्धाची नाही, तर बुद्धाची गरज आहे. बुद्ध म्हणजे सन्मानाने जीवन जगण्याचा मार्ग. सन्मानाने जीवन जगण्यासाठी पंचशीलाचे अनुसरण करणे आवश्यक आहे. विज्ञानाची आणि समाज विज्ञानाची सांगड घालत असताना वैज्ञानिक आधार देत ते म्हणाले की, निरोगी आणि दीर्घायु जगण्यासाठी पंचशील आवश्यक आहे. पंचशीलाचे अनुसरण करणे म्हणजे बौद्ध धर्माचे अनुसरण नव्हे तर समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग होय.

          अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव संपूर्ण जगामध्ये दिसून येतो. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शेतीविषयक धोरण आजच्या परिस्थितीत नितांत प्रासंगिक आहे.   

           प्रास्ताविक डॉ.कविता सोनकांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संदीप पाईकराव  यांनी केले तर आभार डॉ.साईनाथ शाहू यांनी मानले. 

          व्याख्यानास यशवंत प्रबोधन व्याख्यानमाला समितीचे सदस्य प्रा.गौतम दुथडे, प्रा.राजरत्न सोनटक्के, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, डॉ.साईनाथ शाहू, डॉ.एस.एम.दुर्राणी, डॉ.रत्नमाला मस्के, प्रा.भारती सुवर्णकार, प्रा.प्रियंका सिसोदिया, प्रा. ओमप्रकाश गुंजकर, प्रा. श्रीकांत सोमठाणकर, प्रा.अभिनंदन इंगोले आदि प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

           कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रसिद्धी समिती समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज