राष्ट्रवादी काँग्रेसची तब्बल 46 जणांची कार्यकारिणी जाहीर हरिहरराव भोसीकर यांनी केली होती शिफारस

 

नांदेड/प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षसंघटन अधिक वाढावे या हेतुने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे 46 जणांची निवड करण्यासंदर्भात शिफारस केली होती. त्यानुसार जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी आणि प्रदेश उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या उपस्थितीत ह्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे पक्ष संघटन वाढावे, याकरीता हरिहरराव भोसीकर यांच्याकडून प्रयत्न केले जातात. त्या अनुषंगाने लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पक्ष संघटन वाढविण्याच्या हेतुने 46 जणांच्या विविध सेलच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामध्ये पुढील प्रमाणे ः धर्माबाद तालुकाध्यक्षपदी हणमंत जगदंबे, लोहा-कंधार विधानसभा अध्यक्षपदी शिवकुमार भोसीकर, लोहा चिटणीस राजसिंह ठाकूर, धर्माबाद तालुका सचिव दिलीप कदम, कंधार तालुका उपाध्यक्ष प्रकाश केंद्रे, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य गांजापूरकर, मुखेड राष्ट्रवादी चिटणीस संभाजी बोंडाळे, कंधार चिटणीस मोहन वाघमारे, कंधार चिटणीस भास्करराव महाजन, युवकचे नांदेड जिल्हा सचिव शुभम देशमुख, सरचिटणीस विठ्ठल नांदुसेकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्षपदी रविंद्रसिंघ पुजारी, सेवा दलाच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश गांजापूरकर, जिल्हा सरचिटणीस प्रकाश मांजरमकर, जिल्हा सचिव चंपतराव हातागळे, जिल्हा सरचिटणीस माधवराव पवार, जिल्हा उपाध्यक्ष पांडूरंग देशमुख गोरठेकर, लोहा जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ जामगे, कंधार कार्याध्यक्ष शंकरराव पाटील, जिल्हा सचिव दिगंबरराव सोनवळे, जिल्हा सचिव शरद जोशी, लोहा तालुका उपाध्यक्षपदी हणमंतराव खेडकर, कंधार तालुका उपाध्यक्ष मुकूंद चिवडे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गवळे, जिल्हा सरचिटणीस किंवा उपाध्यक्ष म्हणून रमेश माळी, , लोहा तालुकासचिवपदी तुकाराम मोरे, डॉक्टर सेलच्या जिल्हाध्यक्षपदी समीर खांडरे, तालुका सरचिटणीसपदी भाऊराव कस्तुरे, सामाजिक न्याय विभाग माधव कांबळे, जिल्हा सरचिटणीसपदी बाबुराव करडे, बालाजी लांडगे, कंधार सरचिटणीसपदी भुजंगराव कारामुंगे, तालुका सरचिटणीस कंधार म्हणून बाबुराव देवकत्ते, सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सुनील तोडगे, कंधार महिला तालुका उपाध्यक्षपदी मायाताई तोडके, जिल्हा सरचिटणीसपदी बाबुराव केंद्रे, लोहा उपाध्यक्षपदी नारायच शेट्टे, लोहा उपाध्यक्ष किंवा सरचिटणीसपदी नागोराव कस्तुरे, लोहा सामाजिक न्याय विभागाच्या तालुकाध्यक्षपदी देवानंद ऐडके, जिल्हा चिटणीसपदी लक्ष्मण फुलझळके, जिल्हा संघटक सचिवपदी काशीराम वरपडे, कंधार तालुकाध्यक्षपदी नारायण कदम, लोहा तालुका कार्याध्यक्षपदी माधव मोरे, जिल्हा चिटणसीपदी बालाजी पेठकर अशा नावांची शिफारस राज्य प्रदेश उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी केली होती. त्यानुसार ह्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.
यावेळी राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, राज्य प्रदेश उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. भाऊसाहेब देशमुख गोरठेकर, अल्पसंख्यांकचे मकसूद पटेल, शहर कार्याध्यक्ष फेरोज पटेल,जिल्हा कार्यकारिणी सरचिटणीस भगवान भुंजलवाड आदी जणांची उपस्थिती होती. हरिहरराव भोसीकर यांच्या शिफारशीनुसार अनेक जणांच्या निवडी झाल्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष संघटन अधिक वाढणार आहे.
टिप्पण्या