मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सेवानिवृत्त कामगारांचा थोरांदळे ग्रामस्थांनी केला सन्मान*

पुणे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा थोरांदळे येथे शालेय विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम १८ मार्च २०२४ रोजी संपन्न झाला.सदर कार्यक्रमात शालेय व्यवस्थापन समिती व समस्त ग्रामस्थ थोरांदळे यांच्यावतीने *सन्मान भूमिपुत्रांचा* हा अनोखा उपक्रम राबविला गेला. यामध्ये थोरांदळे येथील परंतु मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये सेवा करून निवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा फेटे बांधून व  शाल परिधान करून सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाला सरपंच जे. डी. टेमगिरे, उपसरपंच संदीप टेमगिरे, बाळासाहेब टेमगिरे, सिताराम गुंड,हरिभाऊ गुंड, मुख्याध्यापक केंगले गुरुजी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन टेमगिरे व सर्व सदस्य उपस्थित होते. मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे मा.सेक्रेटरी, प्रसिद्धीप्रमुख व पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेऊन मुलांचे चांगले सांस्कृतिक कार्यक्रम बसविले आहेत. पालकांचे देखील चांगले सहकार्य मिळते. त्यामुळे थोरांदळे गावच्या शाळेला तालुका व जिल्हा स्तरावर अनेक पारितोषिक मिळाली आहेत. त्याचा निश्चितच आम्हा ग्रामस्थांना अभिमान आहे. शाळेने  राबविलेल्या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामस्थ व शिक्षकवृंदाचे मनःपूर्वक अभिनंदन. कार्यक्रमाचे निवेदन संदीप शिंदे यांनी सुंदर केले.

आपला

मारुती विश्वासराव

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज