राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी हरिहरराव भोसीकर यांची निवड तर सरचिटणीसपदी भाऊसाहेब गोरठेकर

 

नांदेड/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी हरिहरराव भोसीकर तर प्रदेश सरचिटणीसपदी अ‍ॅड. भाऊसाहेब गोरठेकर यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबई येथे दि. 19 मार्च रोजी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्सचे संचालक हरिहरराव भोसीकर यांनी नुकताच काही दिवसांपुर्वी त्यांच्या समर्थकांसह अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला होता. त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नांदेड पदाचा राजीनामा दिला होता. हरिहरराव भोसीकर यांचा अनुभव पाहता भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसला होणारा फायदा त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निवड करून पक्षाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली आहे. तसेच प्रदेश सरचिटणीस म्हणून अत्यंत अनुभवी असलेले माजी सभापती अ‍ॅड. वामनराव उर्फ भाऊसाहेब गोरठेकर यांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही निवडीमुळे नांदेड जिल्ह्यात भविष्यात पक्षाला फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या