सिद्धार्थ जाधवच्या ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होतोय अल्ट्रा झकासवर

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात नुकताच प्रदर्शित झालेला आणि आपल्या जबरदस्त गाण्यांसाह सर्वत्र धुमाकूळ घातलेला ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचा २९ मार्च २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. महाराष्ट्रातील चित्रपट रसिक प्रेक्षकांना हा सुवर्णयोग मनस्वी अनुभवता येणार आहे.

श्रुती आणि अथर्व एकमेकांवर प्रेम करतात आणि ते लग्न करणार आहेत. श्रुतीला एक जुळी बहीण आहेतिचे लग्न घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे. जुळी असल्यामुळे श्रुती आणि तिच्या बहिणीची कुंडली सारखीच आहेत्यामुळे अथर्व आणि श्रुतीचे लग्न होऊन घटस्फोट होण्याची शक्यता आहे. खरंच अशी घटना घडेल की घटनेला एक वेगळं वळण मिळेल?

चित्रपटात सिद्धार्थ जाधवभूषण प्रधानऐश्वर्या आहेर आणि सुप्रिया कर्णिक यांच्या प्रमुख भूमिका असून चित्रपट मोहम्मद बर्मावाला आणि मयूर तिरमखे यांनी दिग्दर्शित केला आहे. तसेच प्रिया बेर्डेअमिता कुलकर्णीप्रतिक्षा लोणकर आणि भारत गणेशपुरे हे लोकप्रिय कलाकारही चित्रपटात  दिसणार आहेत.

“नवा विषय आणि नवा आशय असणारा ‘लग्न कल्लोळ’ चित्रपट आणि त्यातील भन्नाट कलाकार प्रेक्षकांचं भन्नाट मनोरंजन करणार आहेत. आम्ही या चित्रपटासोबतच येत्या काळात अनेक मराठी चित्रपट घेऊन येणार असून प्रेक्षकांचं शाश्वत मनोरंजन करणार आहोत.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.  

नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies

प्रसिद्धी जनसंपर्क प्रमुख : राम कोंडीलकर,

राम पब्लिसिटीमुंबई

संपर्क : मो. / व्हॉट्सअँप - ९८२१४९८६५८

इमेल : ramkondilkar.pr@gmail.com

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज