लोकसभेचे भाजपा उमेदवार खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे नांदेड मध्ये जंगी स्वागत : शक्ती प्रदर्शनात हजारो कार्यकर्ते सहभागी

 


नांदेड : होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची उमेदवार खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते आज देवगिरी एक्सप्रेस ने नांदेड रेल्वे स्थानक येथे आले असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले . यावेळी भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते ,पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर महिला कार्यकर्त्यांचा सहभागही लक्षणीय होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन होणार आहे . आब की बार 400 पार चा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात शाश्वत विकासासाठी जनतेला साद घातली आहे. गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पार्टीने केलेल्या असंख्य विकास कामांमुळे देशातील सर्वच घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्यात मोठे यश आले आहे. शेतीपासून मातीपर्यंत आणि ग्रामीण भागापासून महानगरांपर्यंत विकासाचा समतोल साधणाऱ्या मोदी सरकारमुळे खऱ्या अर्थाने देश जागतिक स्पर्धेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. सर्वच क्षेत्रात देशांनी घेतलेली आघाडी ही केवळ आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची जादू आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीतही भारतीय जनता पार्टी 400 खासदारांसह सत्तेत जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. 

नांदेड लोकसभा मतदारसंघातही या निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांना चार लाखावर मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प करण्यात आला असून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खा. चिखलीकर आज पहिल्यांदाच नांदेडमध्ये दाखल झाले . सकाळी नऊ वाजता त्यांची देवगिरी एक्सप्रेसने नांदेड रेल्वे स्थानकावर आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात जय श्रीराम च्या घोषणा देत खा. चिखलीकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज , क्रांतीसुर्य महात्मा फुले , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्षात्रविर महाराणा प्रताप , म. बसवेश्वर , माजी केंद्रीय मंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्यांना खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . 

त्यानंतर खा. प्रतापराव पाटील यांच्या साई सुभाष या संपर्क कार्यालयासमोर रॅलीचा समारोप करण्यात आला . रॅलीत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते .तर महिलांचही लक्षणीय सहभाग होता.

समारोपप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, नांदेड भाजपा लोकसभा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगवकर , माजी महानगर अध्यक्ष प्रवीण साले , जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव तिडके पाटील बोंढारकर,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार, आरपिआय चे विजय सोनवणे , शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे ,किनवटचे आमदार भीमराव केराम यांची समयोचीत भाषणे झाली. 

गत निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला चार लाखाचे मताधिक्य मिळवून द्यायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने जोमाने कामाला लागावे असे आवाहन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात परिपूर्ण आणि शाश्वत विकासासाठी जनतेला तिसरी संधी आली असून आता ही संधी न गमावता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी नांदेड लोकसभा मतदारसंघातून खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांना पुन्हा एकदा निवडून द्या असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

गाफील राहू नका : खा. चिखलीकर यांच्या कार्यकर्त्यांना सूचन

गत निवडणुकीत आपण काँग्रेसचा पराभव केला तो मतदारांच्या पाठबळावरच. आता अशोकराव चव्हाण हे भाजपात आल्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितपणे वाढली आहे. त्यामुळे साहेब तुम्ही चार लाखाच्या मताधिक्याने ,पाच लाखाच्या मताधिक्याने निवडून येणारच असा विश्वास जरी कार्यकर्ते पदाधिकारी व्यक्त करत असले तरी 2009 मध्ये झालेल्या लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील पराभवाचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. त्यावेळी अनेक कार्यकर्ते अशाच पद्धतीने सांगत होते मात्र ते प्रचार कामात गुंतले नव्हते. परिणामी मला पराभवाला सामोरे जावे लागले . हा अनुभव पाठीशी असल्याने कार्यकर्त्यांनी भाषण बाजी पेक्षा प्रत्यक्ष कामाला लागावे . प्रत्येक मतदाराच्या घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराला भारतीय जनता पार्टीला मतदान करण्यासाठी त्यांना विनंती करावी . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामांची माहिती द्यावी. राम मंदिरापासून ते कलम 370 पर्यंत मोदी सरकारने केलेल्या प्रत्येक कामाची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नांदेड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिकाने निवडून देण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करावेत अशा सूचना खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिल्या.

टिप्पण्या
Popular posts
पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेडचे दहावीच्या निकालात घवघवीत यश
इमेज
मिल्लत नगरच्या नागरी सुविधासाठी लोकविकासचे शिष्टमंडळ मनपा आयुक्तांना भेटणार (तातडीने कारवाई केली नाहीतर माकप आंदोलनाच्या पवित्र्यात)
इमेज
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या विविध उपसमित्या जाहिर अभिमन्यू पवार, लातूर – उपाध्यक्ष, सौ. अश्विनी पाटील, पुणे, व सौ ग्रीष्मा पाटील, पालघर – उपाध्यक्ष पदी
इमेज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज
मराठा आरक्षण मुद्द्यावरून तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या.
इमेज