शिवसेना आ. कल्याणकर यांच्या गाडीवर दगडफेक

 

नांदेड : प्रतिनिधी

नांदेड उत्तर मतदार संघाचे शिवसेना आ. बालाजी कल्याणकर यांच्या गाडीवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा येथे रविवारी दुपारी ही घटना घडली. दरम्यान मराठा आंदोलकांनी ही दगडफेक केली असावी असा संशय आहेनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आ. बालाजीराव कल्याणकर हे रविवारी १७ मार्च रोजी अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा येथे एका लग्न समारंभासाठी गेले होते. दुपारच्यावेळी लग्न मंडपाबाहेर उभ्या असलेल्या एमएच २६ बीसी ७७७१ या गाडीवर एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत अज्ञातांनी दगडफेक करून काचा फोडल्या आहेत.

यावेळी गाडीत आमदार अथवा चालक नव्हता, यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. यापुर्वी काही आमदार, खासदारांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले होते..


टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज