स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा नांदेड ग्रॉस एनरोलेमेंट रेशो (उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढ) कृती गटाच्या अध्यक्षपदी सिनेट सदस्य दिपक मोरताळे यांची नियुक्ती.

 

मराठवाडा भाग उच्चशिक्षणा साठी सतत मागास राहिला आहे, त्यातही नांदेड विद्यापीठ भागातील उच्च शिक्षणाचे प्रमाण केवळ 11% टक्के. संपूर्ण महाराष्ट्र चे प्रमाण 35% पेक्षा जास्त आहे.

18 ते 23 या वयोगटातील 89% तरुण उच्च शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर आहेत. विद्यापीठाचे मूल्यमापन ग्रॉस एनरोलेमेंट रेशो म्हणजे 18 ते 23 या वयोगटातील किती तरुण उच्च शिक्षण घेत आहेत या वर ठरत असत.

देश प्रगती करत आहे, प्रगत राष्ट्र होण्यासाठी उच्च शिक्षित तरुणांची देशाला आवश्यकता आहे. सरकार ने नवीन शैक्षणिक धोरण आणून नावीन्य पूर्ण शिक्षण व्यवस्था निर्माण करत आहे. या सुधारित नितीचा, विकसित अर्थ व्यवस्थेचा फायदा आपल्या भागातील तरुणांना व्हावा यासाठी तरुण उच्च शिक्षित असणं आवश्यक आहे. तरुण उच्च शिक्षित नसतील तर पर्यायाने बेरोजगारी चे प्रमाण मोठया प्रमाणात वाढून विभागाचा मागासलेला प्रमाण तसाच राहू शकतो.

उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्याचा ठरावं सिनेट सदस्य श्री दिपक मोरताळे यानी मांडला होता त्याला सिनेट सभागृहाने सर्वानुमते मान्यता दिली होती.कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या आदेशाने कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे यांनी ग्रॉस एनरोलेमेंट रेशो टास्क फोर्स निर्माण करून या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी श्री दिपक मोरताळे यांची नेमणूक केली आहे. या कृतिगटात डॉ खडके, डीन,मानव्य विद्या शाखा,डॉ शैलेश वढेर संचालक इनोवेशन,डॉ प्रकाश जाधव, संचालक, विद्यार्थी विकास विभाग, डॉ मल्लिकार्जुन करजगी, संचालक, रा से यो, डॉ सरिता यन्नावार,सहाय्यक कुलसचिव,शैक्षणिक नियोजन व विकास विभाग सदस्य सचिव म्हणून नेमणूक केली आहे.

विद्यापीठाचा ग्रॉस एनरोलेमेंट रेशो वाढविण्यासाठी टास्क फोर्स संपूर्ण प्रयत्न करेल. "प्रत्येक तरुण पदवीधर उच्चशिक्षित, तरच देश विकसित " ध्येय समोर ठेवून प्राधिकरण काम करेल असे अध्यक्ष श्री दिपक मोरताळे यांनी सांगितले.


टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज