आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करून निवडणूक शांततामय वातावरणात यंत्रणा सज्ज ..

आचारसंहितेचा भंग केल्यास कारवाई करणार

उपविभागीय अधिकारी आरुणा संगेवार

कंधार : प्रतिनिधी

       भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासूनच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करून निवडणूक शांततामय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याचे उपविभागीय अधिकारी सौ. आरुणा संगेवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच यावेळी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.

     दि. 17 रोजी रविवारी दुपारी एक वाजता तहसील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत तहसीलदार रामेश्वर गोरे, नायब तहसीलदार विठ्ठल परळीकर, औ एस अविनाश पानपट्टे, महसूल सहाय्यक एस एस वंजे, निवडणूक समन्वयक मन्मथ थोटे मीडिया कक्षातील सहाय्यक जोगदंड मॅडम जोंधळे मॅडम यांच्यासह प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

     लातूर लोकसभा मतदारसंघात 15 मार्च 2024 रोजीच्या आकडेवारीनुसार एकूण 2 लाख 92 हजार 585 मतदार असून नव मतदारांची नोंदणी 5668 झाली आहे. त्यात दिव्यांग 2414 तर 85 च्या वरील वयोवृद्ध मतदार 4641 आणि शासकीय सेवेतील मतदार 930 आहे. एकूण 330 केंद्रांवर मतदान होईल. या लातूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या 88 विधानसभा मतदारसंघांत अद्यावत मतदार केंद्र राहणार असून मतदान केंद्राच्या ठिकाणी महिला संचलित मतदान केंद्र, दिव्यांग संचालित मतदान केंद्रासह महत्त्वाच्या गरजा पूर्तता करण्याचा प्रयत्न राहील आणि लोकसभा निवडणूक लढविणारे उमदेवार, राजकीय पक्षांना प्रचारासाठी वाहन परवाना, उमेदवाराचे प्रचार कार्यालय, सभा, लाउडस्पीकर व इतर अनुषंगिक बाबींसाठी घ्यावयाच्या परवान्यासाठी एक खिडकी कक्ष तहसील कार्यालय लोहा येथे स्थापन करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

       निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था, आदर्श आचारसंहिता, मनुष्यबळ व्यवस्थापन, निवडणूक खर्च, तक्रार निर्वाण, स्वीप, माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती यासह विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच 88 मतदार संघात 5 भरारी पथके, 4 स्थिर पथके, व्हिडीओ पथके आणि उमेदवारांच्या प्रचारावर निगराणी करण्यासाठी स्थापन करण्यात आली असल्याचे उपविभागीय अधिकारी सौ अरुणा संगेवार यांनी सांगितले. गतवेळी मतदान कमी झालेल्या मतदान केंद्रावर लक्ष केंद्रित करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. तसेच निवडणूक शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

    असा आहे लातूर लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार लातूर लोकसभा मतदारसंघाची अधिसूचना 12 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध होणार असून 19 एप्रिल 2024 पर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. 20 एप्रिल 2024 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी केली जाणार आहे. तसेच 22 एप्रिल 2024 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा कालावधी राहील. 7 मे 2024 रोजी मतदान होणार असून मतमोजणी 4 जून 2024 रोजी होईल.


टिप्पण्या
Popular posts
पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेडचे दहावीच्या निकालात घवघवीत यश
इमेज
मिल्लत नगरच्या नागरी सुविधासाठी लोकविकासचे शिष्टमंडळ मनपा आयुक्तांना भेटणार (तातडीने कारवाई केली नाहीतर माकप आंदोलनाच्या पवित्र्यात)
इमेज
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या विविध उपसमित्या जाहिर अभिमन्यू पवार, लातूर – उपाध्यक्ष, सौ. अश्विनी पाटील, पुणे, व सौ ग्रीष्मा पाटील, पालघर – उपाध्यक्ष पदी
इमेज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज
मराठा आरक्षण मुद्द्यावरून तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या.
इमेज