.
नांदेड, शहर प्रतिनिधि
आज दिनांक 15 रोजी सकाळी सहा वाजता अर्धापूर कडून नांदेड कडे मोटार सायकलवर येणारे बापलेक यांना लातूर हून नागपूरकडे अंगूर घेऊन जाणाऱ्या आयचर चा भीषण अपघात होऊन बापलेक जागीच ठार झाले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अर्धापूर तालुक्यातील भोगाव येथील नामे दाजीबा शंकरराव गाडे वय वर्ष 66 व मुलगा गोपीनाथ दाजीबा गाडे वय वर्ष 45 हे दोघे गावाकडून नांदेडला गोपीनाथ हा आपल्या कॅन्सरग्रस्त वडिल नामे दाजीबा यांना केमोथेरपी उपचारासाठी साठी नांदेडला आपल्या मोटार सायकल क्रमांक MH 22 AG 7822 वरून घेऊन जात होता. तर त्या दरम्यान नांदेड जवळील आसना पुलावर लातूर कडून नागपूरला अंगूर घेऊन जाणारा आईचर क्रमांक MH45 AE 88 11 ची सामने जबर धडक झाली अपघात एवढा भीषण होता की मुलगा गोपीनाथ हा जागीच ठार झाला तर त्याचे वडील दाजीबा त्या धडकेत पुलावरून खाली पडून जागीच ठार झाले.
या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस वसमत फाटा येथील जमादार व्यवहारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी येऊन सदरील जखमींना नांदेड च्या विष्णुपुरी शासकीय दवाखाना येथे नेले असता त्या दोघांना मयत घोषित केले आहे.
सदरील घटना नांदेड च्या विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असून विमानतळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी पुढील तपास करत आहेत.


addComments
टिप्पणी पोस्ट करा