नादेड : नांदेडकरांसाठी बहुप्रत्यक्षित असलेल्या नांदेड - हैद्राबाद आणि नांदेड - अहमदाबाद विमानसेवेला लवकरच सुरुवात होणार असूनही येत्या 31 मार्चपासून ही विमानसेवा नियमितपणे सुरू होणार असल्याची माहिती खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे. शिवाय बेंगलोर - नांदेड - जालिंदर विमानसेवाही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील उडे देश का आम आदमी अर्थात उड्डाण या महत्वकांक्षी विमान सेवेतील नांदेड येथून अनेक विमानसेवा पूर्ववत सुरू होत आहेत. यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडे आणि केंद्रीय उड्डाण मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता . या पाठपुराव्याला यश आले असून येत्या 31 मार्चपासून पूर्वत सुरू होत आहे . अहमदाबाद - नांदेड ही विमानसेवा प्रत्येक आठवड्यातील सोमवार ,मंगळवार ,गुरुवार आणि रविवारी सुरू होणार आहे . शिवाय याच वेळ प्रत्येक आठवड्यातील सोमवार ,मंगळवार, गुरुवार, रविवारी हैदराबाद - नांदेड ही विमानसेवा सुरू होणार आहे . हैदराबाद येथून सकाळी 7:55 मिनिटाला उडाण घेणारे विमान नांदेड येथे सकाळी 8:45 मिनिटांनी पोहचेल तर परतीच्या प्रवासात नांदेड येथून दुपारी चार वाजून 30 मिनिटाला उड्डाण घेणारे विमान हैदराबाद येथे सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटाला पोहोचेल अशी माहिती देण्यात आली आहे . या शिवाय बेंगलोर - नांदेड- दिल्ली , दिल्ली - जालिंदर ही विमानसेवाही सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे . त्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून नांदेडकर यांना जी विमानसेवेची प्रतीक्षा होती ही प्रतीक्षा आता लवकरच संपुष्टात येणार आहे अशी माहितीही खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयाने दिली आहे.

addComments
टिप्पणी पोस्ट करा