नादेड(प्रतिनिधी)-राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांनी काही दिवसांपुर्वी राजीनामा दिल्यानंतर आज त्यांच्या अनेक समर्थकांसह दि.12 मार्च रोजी मुंबई येथे सायंकाळी राष्ट्रवादी कॉंगे्रस पार्टीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी कॉंगे्रसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत हरीहरराव भोसीकर यांच्यासह राष्ट्रवादी कॉंगे्रस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या तालुकाध्यक्ष व इतर 30 पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंगे्रस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी कॉंगे्रस पार्टी शरदचंद्र पवार नांदेड जिल्हाध्याचे अध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांनी काही कारणे पुढे करून नांदेड जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे दिला होता. ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबद्दल उत्स्कुता होती. अखेर त्यांनी दि.12 मार्च रोजी सायंकाळी मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंगे्रस पार्टीमध्ये त्यांच्या 30 समर्थकांसह प्रवेश केला आहे. यावेळी आ.विक्रम काळे, नांदेड राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाचे चेअरमन वसंतराव भुईखेडकर, प्रदेश चिटणीस वसंत सुगावे पाटील, नांदेड शहर जिल्हाध्यक्ष जिवन पाटील घोगरे, उमरी तालुकाध्यक्ष विक्रम देशमुख, दिलीप बेटमोगरेकर आदी जणांची उपस्थिती होती.
राष्ट्रवादी कॉंगे्रस पार्टीचे नेते अजितदादा पवार यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्र्वास ठेवून राष्ट्रवादी कॉंगे्रस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे असे मत हरीहरराव भोसीकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादीचे नेते हरीहरराव भोसीकर यांच्यासह उमरी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ऍड.भाऊसाहेब गोरठेकर, धर्माबाद तालुकाध्यक्ष हनमंत जगदंबे, लोहा-कंधार विधानसभा अध्यक्ष शिवकुमार भोसीकर, कंधार तालुका अध्यक्ष अंगद केंद्रे, लोहा तालुका अध्यक्ष रमेश माळी, जिल्हा सरचिटणीस संग्राम हायगले, सरचिटणीस विठ्ठल पाटील नांदुसेकर, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष रविंद्रसिंघ पुजारी, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष रमेश गांजापूरकर, जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक गफार खान गुलाब महम्मद खान, जिल्हा सचिव प्रकाश मांजरमकर, चंपत हातागले, जिल्हा सरचिटणीस माधवराव पवार, जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष पांडूरंग गोरठेकर, तालुका उपाध्यक्ष लोहा जगननाथ जामगे, राजूसिंह ठाकूर, बुथ कमिटी अध्यक्ष दिलीप कदम, विद्यार्थी तालुकाध्यक्ष शंकर गोपने या राष्ट्रवादी कॉंगे्रस शरदचंद्र पवार पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मुंबई येथे प्रवेश केला आहे.
--

addComments
टिप्पणी पोस्ट करा